TRENDING:

Fridge Intresting Facts : फ्रिजमधून अचानक आवाज का येतो, तो कसला असतो?

Last Updated:
Fridge Sound Causes : सगळं काही शांत असताना अचानक फ्रिजमधून एखादा कट किंवा आणखी कोणता तरी विचित्र आवाज येतो? या आवाजामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/5
Fridge Intresting Facts : फ्रिजमधून अचानक आवाज का येतो, तो कसला असतो?
फ्रिज हा सतत चालणारा आणि आतल्या तापमानाचा ताळमेळ ठेवणारं उपकरण. त्यामुळे त्यात वेळोवेळी काही आवाज होणं अगदी सामान्य आहे. पण हे आवाज का होतात याचा विचार तुम्ही केला आहे का?
advertisement
2/5
फ्रिजमधील कम्प्रेसर म्हणजे फ्रिजचं हृदय. पण तो सतत चालत नाही फक्त तापमान वाढलं की सुरू होतो आणि थंड झालं की बंद होतो.
advertisement
3/5
फ्रॉस्ट फ्री फ्रिजमध्ये आत छोटा फॅन असतो. तो चालू झाल्यावर तसंच बर्फ जास्त असेल, फॅनवर जमा झाला असेल तर असा आवाज येतो. फ्रॉस्ट फ्री फ्रिज डिफॉरेस्ट मोडमध्ये जातानाही असा आवाज होतो. काही फ्रिजमध्ये आइस मेकर असतो, तो बर्फ सोडताना आवाज देतो.
advertisement
4/5
फ्रिजच्या आत रेफ्रिजरंट नावाचा गॅस दाब बदलून सतत फिरत असतो. तो वेगाने वाहतो तेव्हा असे आवाज होतात. हा आवाज म्हणजे सिस्टम नीट चालू आहे याचं संकेत.
advertisement
5/5
फ्रिजच्या भिंती, ट्रे, बॉडीचं प्लॅस्टिक आणि मेटल भाग थंड–उष्णतेमुळे फुगतात किंवा आकसतात. यामुळे असे आवाज येऊ शकतात. फ्रिज योग्यरित्या समतल नसला तर कम्प्रेसर आणि मोटरच्या कंपनांचा आवाज वाढतो. कधी कधी काचेकडे, भिंतीकडे किंवा कोणत्या वस्तूकडे टेकला तरी आवाज होतो. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Fridge Intresting Facts : फ्रिजमधून अचानक आवाज का येतो, तो कसला असतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल