Health Risk of The Day : कापलेलं कलिंगड फ्रिजमध्ये ठेवलं तर खरंच विषारी होतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Watermelon in fridge : कलिंगड खूप मोठा असतो. जास्त लोक नसतील तर एकट्या, दोघांना तो एकाच वेळी संपूर्ण खाणं शक्य होत नाही. मग उरलेला कलिंगड फ्रिजमध्ये ठेवला जातो. पण असं म्हणतात की असं कलिंगड विषासारखं होतं.
advertisement
1/7

उन्हाळ्यात कलिंगड आरोग्यासाठी चांगला. कलिंगडात व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. पण हे कलिंगड ताजं खाण्याऐवजी कापून फ्रिजमध्ये ठेवलं आणि काढलं तर ते विषारी होतं असं म्हणतात. असं खरंच होतं का?
advertisement
2/7
जर्नल ऑफ फूड साइन्समध्ये प्रकाशित अभ्यासानुसार फ्रिजमध्ये कलिंगड ठेवल्याने व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण कमी होऊ शकतं. व्हिटॅमिन सी अस्थिर व्हिटॅमिन आहे जे थंड तापमानात कमी होऊ शकतं. अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण कमी झाल्याने फळांची गुणवत्ता आणि पोषण तत्त्वांना प्रभावित करू शकतं.
advertisement
3/7
जर्नल ऑफ अॅग्रीकल्चर अँड फूड केमिस्ट्रीमधील अभ्यासानुसार कलिंगड फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची गुणवत्ता आणि पौष्टिक मूल्यांवर नकारात्मक प्रभाव पडू शकतं.
advertisement
4/7
जर्नल ऑफ फूड प्रोटेक्शनमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार कलिंगड नीट ठेवलं नाही तर त्यात बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते.
advertisement
5/7
जर्नल ऑफ फूड सायसेन्समध्ये प्रकाशित अभ्यासानुसार कलिंगडात नाइट्रेट्स निर्माण होऊ शकतात. पण याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे.
advertisement
6/7
त्यामुळे कापलेलं कलिंगड फ्रिजमध्ये ठेवल्याने विष होईल की नाही याचं थेट उत्तर देणं मुश्किल आहे. ते विषारी बनतं याचं काही वैज्ञानिक प्रमाण नाही. पण नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या मते, त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, त्याच्या पौष्टिक घटकांमध्ये बदल होऊ शकतो आणि ते आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकतं.
advertisement
7/7
त्यामुळे कलिंगडाच्या पोषक घटकांचा फायदा घ्यायचा असेल तर ते ताजं आणि नीट स्टोअर करून खाणं गरजेचं आहे. कापलेलं कलिंगड हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा. फ्रिजमध्ये तापमान 4°C (39°F) नसावं. कापलेलं कलिंगड 3-4 दिवसांतच खा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Risk of The Day : कापलेलं कलिंगड फ्रिजमध्ये ठेवलं तर खरंच विषारी होतं?