TRENDING:

20 रुपयांपासून खरेदी करा बाप्पाच्या सजावटीसाठी साहित्य, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?

Last Updated:
गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणारे सामान मुंबईमध्ये आपल्याला स्वस्त दरात कुठे मिळेल?
advertisement
1/6
20 रुपयांपासून खरेदी करा बाप्पाच्या सजावटीसाठी साहित्य, हे ठिकाण माहितीये का?
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे जय्यत तयारी सुरु आहे. गणेशोत्सवात आपले डेकोरेशन आणखीन सुरेख कसे दिसेल याचा विचार करत लोक वेगवेगळ्या थीम्स शोधत आहेत. त्यातच गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणारे सामान <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईमध्ये</a> आपल्याला स्वस्त दरात कुठे मिळेल? याचा शोध सर्वचजण घेत असतात.
advertisement
2/6
सध्या सर्वात सोपे डेकोरेशन म्हणजेच फुलांच्या आणि वेलींच्या सजावटीला भाविक प्राधान्य देत आहेत. या फुलांच्या सजावटीसाठी लागणारे नकली फुलं, वेली आणि फुलांचा गुच्छा आपल्याला मुंबईच्या प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमध्ये मिळतील.
advertisement
3/6
मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमध्ये अनेक प्रकारचे आर्टिफिशल फुले मिळतात. अगदी खरोखर दिसणारे हे पानफुल गणपतीच्या सजावटीसाठी एक उत्तम पर्याय आहे. जे लोक पर्यावरणाचा विचार करतात आणि फक्त कुठल्या सणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये अशी इच्छा असणाऱ्या लोकांसाठी हे आर्टिफिशल कपड्यांनी बनलेले फुले एक सर्वोत्तम पर्याय आहे.
advertisement
4/6
येथे मिळणाऱ्या आर्टिफिशियल फुलवेलींची किंमत ही 20 रुपयांपासून सुरू होते. लोहार चाळीतील हे आर्टिफिशियल फुलांचे दुकान आलम उमर खान हे सांभाळतात. जास्त प्रमाणात खरेदी केल्यास येथे खरेदी दारांना सूट देखील मिळते.
advertisement
5/6
मुंबईच्या या प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेले हे हलीमा फ्लॉवर दुकान आर्टिफिशियल फुलवेलींसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी 20 रुपयात तुम्हाला फुलांचा एक गुच्छ खरेदी करता येईल. वेगवेगळ्या प्रकारच्या पानांच्या लढी या ठिकाणी 300 रुपये डझन आणि 25 रुपये प्रति लड अशी खरेदी करता येईल.
advertisement
6/6
त्याचबरोबर बॅक ड्रॉप साठी लागणारे चना मॅट म्हणजेच वेलींचे चौकोनी मॅट या ठिकाणी 75 रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत खरेदी करता येतील, अशी माहिती दुकानाचे मालक आलम उमर खान यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
20 रुपयांपासून खरेदी करा बाप्पाच्या सजावटीसाठी साहित्य, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल