Happy Makar Sankranti Photo : संक्रांतीला डीपी, स्टेससला ठेवा हे मकरसंक्रांती शुभेच्छा फोटो
- Published by:Priya Lad
Last Updated:
Happy Makar Sankranti Wishes Photo : नवीन वर्षातील पहिला सण मकरसंक्रांत. यादिवशी शुभेच्छा देणं, सोशल मीडियावर फोटो, स्टेटस ठेवणं आलंच. त्यासाठी हे मकरसंक्रांतीचे खास फोटो.
advertisement
1/7

नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. हा सण आपल्या नात्यातील कटुता विसरून नवीन, गोड सुरुवात करण्याचा सण मानला जातो.
advertisement
2/7
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य जेव्हा कोणत्याही राशीत प्रवेश करतो, त्याला संक्रांत म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करून आपल्या पुत्र शनीदेव यांच्याकडे जातात, असं मानलं जातं.
advertisement
3/7
सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, तर तो मकर संक्रांती होतो. यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजून 6 मिनिटांनी सुरू होणार आहे. त्याच वेळेपासून महापुण्यकाळालाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे मकर संक्रांती 14 जानेवारीला आहे.
advertisement
4/7
यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे आणि हा काळ दुपारी 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत असणार आहे.
advertisement
5/7
काही धार्मिक कथांनुसार, या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वीवर धर्माची स्थापना करून अधर्माचा नाश केला होता. तसंच राजा भागीरथाच्या तपश्चर्येमुळे गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली आणि या दिवसापासून गंगा नदीला पतित पावन म्हणून ओळखलं जाऊ लागले, अशीही मान्यता आहे.
advertisement
6/7
हिंदू धर्मात मकर संक्रांतीला महत्त्वाचं स्थान आहे. या दिवशी पवित्र नद्या, तीर्थक्षेत्रे तसेच तलावांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. या दिवशी गंगा स्नानाचा योग्य काळ सकाळी 9 वाजल्यापासून 10 वाजून 48 मिनिटांपर्यंत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या पुण्यकाळात दान, पूजन आणि धार्मिक विधी केल्यास विशेष पुण्यप्राप्ती होते.
advertisement
7/7
मकर संक्रांतीचा सण शेती आणि पीक कापणीशी जोडलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Happy Makar Sankranti Photo : संक्रांतीला डीपी, स्टेससला ठेवा हे मकरसंक्रांती शुभेच्छा फोटो