TRENDING:

Fish Egg : फिश फ्राय खाल्ला असाल, पण कधी 'माशांची अंडी' ट्राय केलीत का? चवीसोबतच आरोग्याचा खजिना

Last Updated:
माशांची अंडी हे केवळ खवय्यांसाठी एक सुख नसून ते आरोग्यासाठी 'सुपरफूड' मानले जाते. जर तुम्ही आरोग्याबाबत जागरूक असाल आणि काहीतरी नवीन चविष्ट डिश शोधत असाल, तर माशांच्या अंड्यांचे महत्त्व आणि त्यापासून बनणारे पदार्थ तुम्हाला नक्कीच थक्क करतील.
advertisement
1/7
फिश फ्राय खाल्ला असाल, पण कधी 'माशांची अंडी' खाल्ली? चवीसोबतच आरोग्याचा खजिना
सी-फूडप्रेमींसाठी मासे खाणे म्हणजे एक पर्वणीच असते. पापलेट, सुरमई किंवा रावस यांसारख्या माशांवर आपण ताव मारतोच, पण अनेकदा आपण एका खास गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, ती म्हणजे 'माशांची अंडी' (Fish Roe). ज्याप्रमाणे चिकनची अंडी आवडीने खाल्ली जातात, त्याचप्रमाणे माशांची अंडी देखील खाण्यासाठी अत्यंत सुरक्षित आणि पौष्टिक असतात.
advertisement
2/7
खरे तर, माशांची अंडी हे केवळ खवय्यांसाठी एक सुख नसून ते आरोग्यासाठी 'सुपरफूड' मानले जाते. जर तुम्ही आरोग्याबाबत जागरूक असाल आणि काहीतरी नवीन चविष्ट डिश शोधत असाल, तर माशांच्या अंड्यांचे महत्त्व आणि त्यापासून बनणारे पदार्थ तुम्हाला नक्कीच थक्क करतील.
advertisement
3/7
माशांची अंडी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन बी12 आणि सेलेनियम सारखी खनिजे आढळतात. हृदयविकार: ओमेगा-3 मुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मेंदूच्या विकासासाठी हे उत्तम आहे. यातील खनिजांमुळे शरीराची आजारांशी लढण्याची शक्ती वाढते.
advertisement
4/7
कशी बनवायची ही चविष्ट मेजवानी?माशांच्या अंड्यांचा वापर करून विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवता येतात. चला तर जाणून घेऊया काही लोकप्रिय रेसिपीज1. झणझणीत फिश एग करी : हे बनवण्यासाठी माशांची अंडी प्रथम स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हळद आणि मीठ लावून तेलात हलके तळून घ्या. कढईत कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट आणि गरम मसाला टाकून छान ग्रेव्ही तयार करा आणि त्यात ही तळलेली अंडी सोडा. भाकरी किंवा भातासोबत ही करी अप्रतिम लागते.
advertisement
5/7
2. पौष्टिक भुर्जी : जशी आपण अंड्याची भुर्जी करतो, तशीच माशांच्या अंड्यांची भुर्जी देखील बनते. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि तुमच्या आवडीचे मसाले वापरून ही भुर्जी बनवता येते. नाश्त्यासाठी हा एक उत्तम प्रोटीनयुक्त पर्याय आहे.
advertisement
6/7
3. कुरकुरीत वडे किंवा भजी : बेसन, तिखट, मीठ आणि कोथिंबीर यांच्या मिश्रणात माशांची अंडी घालून त्याचे गोल टिक्के किंवा छोटी भजी तळून घ्या. चहासोबत संध्याकाळच्या नाश्त्याला हा पदार्थ नक्कीच तुमची दाद मिळवून देईल.4. आगळावेगळा 'हलवा' : हो, तुम्ही बरोबर वाचलंत! माशांच्या अंड्यांचा गोड हलवा देखील बनवला जातो. अंडी हलकी तळून त्यात साखर आणि वेलची पूड घालून हा पदार्थ तयार होतो. सण-समारंभाला काहीतरी वेगळं म्हणून हा हलवा ट्राय करता येईल.
advertisement
7/7
माशांची अंडी चवीला जेवढी युनिक असतात, तेवढीच ती शरीरासाठी फायदेशीरही आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही नवीन पदार्थाचा आहारात समावेश करताना तो मर्यादित प्रमाणात असावा. तर मग, पुढच्या वेळी मासे आणताना त्यांची अंडी टाकून देऊ नका, तर यापैकी एखादी रेसिपी नक्की करून पहा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Fish Egg : फिश फ्राय खाल्ला असाल, पण कधी 'माशांची अंडी' ट्राय केलीत का? चवीसोबतच आरोग्याचा खजिना
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल