TRENDING:

Health Tips : काळे, पिवळे, लाल, हिरवे.. इतक्या रंगांचे असतात मनुके, पण कोणते जास्त फायदेशीर?

Last Updated:
मनुका हे असे ड्रायफ्रूट आहे, जे सर्व वयोगटातील लोकांना खायला आवडते. मनुके अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये चव आणि सजावटीसाठी वापरतात. मनुके आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. मनुके खाल्ल्याने शरीराचा थकवा दूर होतो, हाडे मजबूत होतात आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. मात्र आपल्यासाठी नेमके कोणत्या रंगाचे मनुके जास्त फायदेशीर आहेत. चला जाणून घेऊया.
advertisement
1/5
काळे, पिवळे, लाल, हिरवे.. इतक्या रंगांचे असतात मनुके, पण कोणते जास्त फायदेशीर?
बहुतेक लोक काळे किंवा लाल मनुके सर्वाधिक खातात. परंतु बाजारात अनेक रंगांचे मनुके उपलब्ध आहेत आणि त्यांचे फायदे देखील भिन्न आहेत. चला आज आपण मनुक्याचे विविध प्रकार आणि त्यांचे फायदे जाणून घेऊया.
advertisement
2/5
पिवळे मनुके : पिवळे मनुके इतर मनुक्यापेक्षा आकाराने किंचित लहान असतात. हे थॉम्पसन सीडलेस द्राक्षांपासून तयार केले जाते. हे खायला खूप चविष्ट आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. सोनेरी म्हणजेच पिवळ्या मनुका फायबर, पोटॅशियम आणि लोहाने समृद्ध असतात. त्यामुळे ऊर्जा वाढते. हाडे मजबूत ठेवतात.
advertisement
3/5
काळे मनुके : काळे मनुके हे अतिशय सामान्य मनुके आहेत. ते बाजारात सहज उपलब्ध असतात. हे काळ्या द्राक्षापासून तयार केले जाते. काळे मनुके हाडांसाठी फायदेशीर असतात आणि शरीराला ऊर्जाही देतात. काळ्या मनुक्यामध्ये फायबर, लोह पोटॅशियमचा चांगला स्रोत मानला जातो. हे त्वचा, केस आणि पचनसंस्थेसाठीही खूप फायदेशीर असतात.
advertisement
4/5
लाल मनुके : लाल मनुके सर्वात स्वादिष्ट मनुके आहेत. हे लाल द्राक्षापासून तयार केले जाते. लाल मनुके मधुमेहामध्ये फायदेशीर मानले जातात. हे खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. लाल मनुके अँटी ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन के आणि सी युक्त असतात. हे तुमचे डोळे आणि दातांसाठीही फायदेशीर असतात.
advertisement
5/5
हिरवे मनुके : हिरवे मनुके लांब आणि पातळ आकाराचे असतात. हे मनुके फायबरने समृद्ध असतात. हे खाल्ल्याने पोटाशी संबंधित आजारांपासून दूर राहता येते. हिरवे मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. फायबर आणि जीवनसत्वांनी युक्त हे मनुके हृदयविकाराचा धोका कमी करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Tips : काळे, पिवळे, लाल, हिरवे.. इतक्या रंगांचे असतात मनुके, पण कोणते जास्त फायदेशीर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल