TRENDING:

विड्याच्या पानाला पूजेचा मान! आयुर्वेदातही सांगितलंय नागवेल आरोग्यासाठी रामबाण!

Last Updated:
नागवेलीचे पान हे सर्दी खोकला कमी करण्यास मदत करते. दमा आणि श्वसन विकारांसाठीही विड्याची पाने उपयुक्त ठरतात.
advertisement
1/7
विड्याच्या पानाला पूजेचा मान! आयुर्वेदातही सांगितलंय नागवेल आरोग्यासाठी रामबाण!
नागवेलीच्या पानाचे अनेक पारंपारिक आणि औषधी महत्त्व आहे. नागवेलीची पाने हे विविध संस्कृतीमध्ये आणि <a href="https://news18marathi.com/tag/ayurveda/">आयुर्वेदामध्ये</a> औषधी गुणधर्मासाठी वापरली जातात. या पानांना काही भागात खाऊचे पान म्हणूनही ओळखले जाते. आयुर्वेदिक तज्ञ डॉ. शुभदा गुंजाळ चोखंडे यांनी नागवेलीच्या पानांच्या <a href="https://news18marathi.com/tag/health/">औषधी गुणधर्मांबाबत</a> माहिती दिलीये.
advertisement
2/7
नागवेलीला आपल्याकडे धार्मिक अधिष्ठानही मिळालेले आहे. घरात कोणतीही पूजा असल्यास सर्वात प्रथम खाऊची पाने आणली जातात. त्यामुळे सहज मिळत असल्याने या पानांचा उपयोग घेता येतो. अनेक जण आता आपल्या घराच्या कुंड्यांमध्येही खाऊच्या पानांचा वेल लावून ती पाने वापरतात.
advertisement
3/7
नागवेलीची पान हे सर्दी खोकला कमी करण्यास मदत करते. दमा आणि श्वसन विकारांसाठीही नागवेलीची पाने उपयुक्त ठरतात. गरम पाण्यात काढा करून घेतल्याने श्वास मार्ग मोकळा होतो. लहान मुलांना सर्दी, खोकला झाल्यास नागवेलीच्या पानांना तिळाचे तेल लावून थोडे कोमट करून ते मुलांच्या छातीवर ठेवले तर कफ सुटण्यास मदत होते.
advertisement
4/7
नागवेलीचे पान चघळल्याने पचनक्रिया सुधारते. तोंडाला चव नसणे, घसा खवखवणे, यावरही हे पान उपयुक्त आहे. यामध्ये अँटीसेप्टिक अँटिबायोटिक आणि फंगल गुणधर्म आहेत. त्यामुळे हे पान त्वचेच्या इन्फेक्शनवर आणि जखमांवर प्रभावी व गुणकारक आहे. नागवेलीचे पान चघळल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होते. त्यामुळे तोंडातील जंतू नष्ट होतात व दात हिरड्या मजबूत होतात, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
5/7
नागवेलीची हिरवीगार ताजी पाने स्वच्छ धुऊन एका कापडाने पुसून घ्यावे आणि त्याच्या शिरा आणि देठ काढून त्याला चुना, काथा, वेलदोड्याची दोन दाणे, घरी केलेला सुपारी, बडीशेप, गुलकंद, सुके आणि ओले खोवलेले खोबरे, लवंग लावून विडा बनवला जातो. हा विडा विशेष म्हणजे आजी आजोबांचा पानपुडा म्हणून त्याची ओळख आपल्या घरात आहे.
advertisement
6/7
नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर पान खाण्याचे अनेकजण शौकीन असतात. त्यामुळे तोंडाची चव वाढते. तोंडाला दुर्गंध येत नाही. तसेच दात पोकळी, दात किडणे यांचा त्रास कमी होतो. जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतड्या निरोगी राहतात. आरोग्यासोबतच ते सौंदर्य वाढवण्यातही फायदेशीर ठरते, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
7/7
सूचना - वर दिलेली माहिती आरोग्यतज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही. (शुभम बोडके, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
विड्याच्या पानाला पूजेचा मान! आयुर्वेदातही सांगितलंय नागवेल आरोग्यासाठी रामबाण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल