TRENDING:

Health Tips : तुमची मुलं जेवतानाही मोबाईल पाहतात का? ही सवय मोडण्याचा सोप्पा उपाय

Last Updated:
मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ही सवय कशी सोडवावी याबद्दच तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
advertisement
1/7
तुमची मुलं जेवतानाही मोबाईल पाहतात का? ही सवय मोडण्याचा सोप्पा उपाय
कोरोना काळापासून मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे मुलं हे मोबाईलच्या आहारी गेलेले पाहिला मिळत आहेत. अशातच पालकाने जर मुलांकडून मोबाईल काढून घेतला किंवा मुलांना मोबाईल बाजूला ठेवून दे म्हंटल तर मुलं हे चुकीचं पाऊल उचलतात.
advertisement
2/7
त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल पासून कसं दूर ठेवावं? त्याचबरोबर मुलाने देखील मोबाईल पासून कसं दूर राहावं? याबद्दल छत्रपती संभाजीनगर मधील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
सध्याला मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मोबाईलच्या आहारी गेलेल्या माझ्याकडे दर दिवसाला अशा बऱ्याच केसेस येतात. त्याचं बरोबर आपण पाहात आहोत की गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्यांमधून पालकांनी मोबाईल न दिल्यामुळे मुलाने उचललं चुकिचं पाऊल अश्या बातम्या येत आहेत.
advertisement
4/7
याला सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आजकाल पालकांकडे मुलांना द्यायला वेळ नसतो. म्हणून पालक मुलांना मोबाईल देतात. जेवण करत नाही म्हणून मोबाईल देतात. मोबाईल दिल्यामुळे मुलं जेवण करतानाही मोबाईल वापरतात. त्यासोबतच अभ्यासातलं काही विचारलं तर ते बघण्यासाठी देखील पालक मुलांना मोबाईल देतात. पालकांनी सतत मुलांना मोबाईल दिल्यामुळे सुद्धा मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे व्यसन हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे, असं डॉ. संदीप शिसोदे सांगतात.
advertisement
5/7
आपल्या शरीरातील डोप्पामाइन हे रसायन सिक्रट होत असतो आणि हे रसायन सिक्रेट झाल्यामुळे देखील मोबाईल हे मुलं मोठ्या प्रमाणात बघतात. यामुळे पालकांनी आपल्या मुलांबरोबर जास्तीत जास्त वेळ द्यावा. मुलांना सतत मोबाईलवरून टोमणे मारणे बंद करावे त्यांना समजावून सांगावं. आपल्या मुलानं नीट प्रेमाने समजून सांगा.
advertisement
6/7
त्यासोबतच मुलांना आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवायला लावावा. त्यासोबतच मैदानी खेळ देखील खेळावे. असं केलं तर मुलं हे मोबाईल पासून दूर होतील आणि ते कोणते चुकीचं पाऊल हे उचलणार नाहीत, असं डॉ. संदीप शिसोदे सांगतात.
advertisement
7/7
त्यासोबतच मुलाने देखील आपण मोबाईल पासून कसं दूर राहावं याकडे लक्ष द्यावे. अभ्यास करताना मोबाईल मधून अभ्यास करू नये, त्याचं बरोबर मोबाईल गेम खेळत बसू नये, असंही डॉ. संदीप शिसोदे सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : तुमची मुलं जेवतानाही मोबाईल पाहतात का? ही सवय मोडण्याचा सोप्पा उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल