TRENDING:

Body Detox : बाॅडी डिटाॅक्स करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग; काही दिवसांतच दिसतो चांगला परिणाम

Last Updated:
आजच्या धकाधकीच्या जगात शरीराचं डिटॉक्स करणं आवश्यक आहे. यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या, अल्कोहोल टाळ, अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त आहार घे आणि फायबरयुक्त पदार्थ खा. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि आरोग्य सुधारतं.
advertisement
1/6
बाॅडी डिटाॅक्स करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग; काही दिवसांतच दिसतो चांगला परिणाम
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांचं रोजचं रूटीन बिघडलं आहे. यामुळे शरीराला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत स्वतःला फिट ठेवण्यासाठी शरीराचं डिटॉक्स करणं खूप महत्वाचं होतं.
advertisement
2/6
शरीराचं नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करण्यासाठी काही उपाय करावे लागतात. यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्यावं. असं केल्याने चयापचय क्रिया व्यवस्थित राहते. त्याचबरोबर शरीराचं डिटॉक्सही होतं.
advertisement
3/6
अधिक प्रमाणात अल्कोहोल पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याच्या सेवनाचा लिव्हर आणि फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. त्याचबरोबर काम करण्याची क्षमताही कमी होते. अशा परिस्थितीत अल्कोहोल पिणं बंद करावं. त्यामुळे शरीराचं डिटॉक्स होतं.
advertisement
4/6
यावर उपाय म्हणून तुमच्या आहारात अँटी-ऑक्सिडंट्सने भरपूर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. यामध्ये कडधान्ये, हिरव्या भाज्या, फळे इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर ग्रीन-टी आणि हंगामी फळांचाही समावेश होतो.
advertisement
5/6
साखर खूप कमी प्रमाणात सेवन करावी. यात उच्च कॅलरीज असतात. ज्यामुळे आरोग्य व्यवस्थित ठेवणं कठीण होतं. त्याचबरोबर जास्त साखर खाणं लिव्हरमधील चरबी वेगाने वाढवतं.
advertisement
6/6
तुमच्या खाद्यपदार्थात फायबरचा समावेश असणं आवश्यक आहे. हे चयापचय क्रिया व्यवस्थित ठेवतं. आहारात ज्वारी, बाजरी, ब्राउन राईस, सफरचंद, केळं, बीज असलेल्या भाज्या, पालक यांचा समावेश करायला हवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Body Detox : बाॅडी डिटाॅक्स करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग; काही दिवसांतच दिसतो चांगला परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल