तुमचा पार्टनर 'पझेसिव्ह' असणं चांगलं की वाईट? याला तुम्ही प्रेम समजता का? सावधान, ही सवय तोडू शकते नातं!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो, पण जेव्हा जोडीदार अती पझेसिव्ह होतो, तेव्हा तो नात्यासाठी धोकादायक ठरू शकतो. ओब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर असलेल्या लोकांना सतत आपल्या जोडीदारावर नियंत्रण...
advertisement
1/7

जर तुमचा पार्टनर तुम्हाला वारंवार फोन करत असेल, तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत असेल, तुमच्या प्रत्येक मित्राबद्दल चौकशी करत असेल, एखाद्या मुलगा किंवा मुलगीने तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्यास त्याला राग येत असेल, तो तुम्हाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असेल, तर अनेक लोक याला प्रेम समजतात. त्यांना वाटतं की त्यांचा पार्टनर त्यांची काळजी घेतोय. पण हे प्रेम नाही. पार्टनरचा हक्क दाखवणं नात्यासाठी चांगलं नसतं.
advertisement
2/7
प्रेमात एकमेकांबद्दल विचार येणं खूप सामान्य आहे. जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात असते, तेव्हा त्याला आपला पार्टनर सकाळ-संध्याकाळ दिसावा, त्याच्याशी बोलायला मिळावं असं वाटतं, पण जर हे मर्यादेपेक्षा जास्त वाढलं, तर ते प्रेम नव्हे, तर टोकाची ओढ (obsession) असू शकते.
advertisement
3/7
मानसोपचारतज्ज्ञ मुस्कान यादव सांगतात की हे अनेकदा ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डरचे (obsessive love disorder) बळी असलेल्या लोकांमध्ये दिसून येतं. अशा स्थितीत, व्यक्ती आपल्या पार्टनरबद्दल खूप जास्त हक्क दाखवणारी आणि टोकाची ओढ असलेली होते. हे नात्याच्या शेवटी धोकादायकही ठरू शकतं. असे लोक काहीही करू शकतात.
advertisement
4/7
अनेक लोक त्यांच्या पार्टनरबद्दल असुरक्षित (insecure) असतात. जर त्यांच्या पार्टनरशी एखादा मुलगा किंवा मुलगी वारंवार बोलत असेल, तर त्यांना वाटतं की त्यांचं प्रेम हिरावून घेतलं जाईल. असं यासाठी होतं कारण त्यांना त्यांच्या पार्टनरवर विश्वास नसतो आणि ते जळायला लागतात.
advertisement
5/7
अनेकवेळा ते त्यांच्या पार्टनरच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांमध्येही ढवळाढवळ करायला लागतात. त्यांना वाटतं की त्यांच्या पार्टनरने फक्त त्यांच्याशी बोलावं, फक्त त्यांचाच विचार करावा. या कृत्त्यांमुळे नात्यात दुरावा आणि कटुता निर्माण होते.
advertisement
6/7
जे लोक पझेसिव्ह असतात, त्यांना त्यांच्या पार्टनरवर पूर्ण नियंत्रण ठेवायचं असतं. ते हे विसरतात की ज्या व्यक्तीवर ते प्रेम करतात ती देखील एक माणूस आहे, त्यांच्या हातातली बाहुली नाही. असे लोक त्यांच्या पार्टनरला काहीही करण्यापासून थांबवतात, त्यांचा फोन तपासतात, त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सचे पासवर्ड घेतात, त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा नोंदवतात आणि प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारतात.
advertisement
7/7
जर पार्टनर पझेसिव्ह असेल, तर तो प्रत्येक गोष्टीवर शंका घेतो. अशा प्रकारच्या वागणुकीमुळे नातं जास्त काळ टिकू शकत नाही. जर पार्टनर असं करत असेल, तर त्याच्याशी मनमोकळी चर्चा करावी. त्यांना समजावून सांगावं की हक्क वस्तूवर दाखवता येतात, माणसांवर नाही, त्यांनी मनात कोणताही गैरसमज ठेवू नये. बोलूनही जर गोष्टी ठीक होत नसतील, तर आपल्या सीमा निश्चित कराव्यात, जेणेकरून पार्टनरला समजू शकेल की तुम्ही एक वेगळी व्यक्ती आहात. तरीही जर गोष्टी व्यवस्थित होत नसतील, तर रिलेशनशिप कौन्सिलरची (relationship counselor) मदत घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
तुमचा पार्टनर 'पझेसिव्ह' असणं चांगलं की वाईट? याला तुम्ही प्रेम समजता का? सावधान, ही सवय तोडू शकते नातं!