हे एक पान खा अन् आजारांना पळवून लावा, आपल्या आसपासच आहे जीवनसत्त्वांचा खजिना
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
आयुर्वेदात कडुलिंबाला शुध्दीकारक मानले जाते. कडुलिंबाची पाने, डहाळ्या, निंबोळी, साल हे सर्वच आरोग्यासाठी गुणकारी आहे.
advertisement
1/5

आपल्या आसपास असणाऱ्या अनेक वनस्पती या आरोग्यासाठी वरदान असतात. अशाच एका वनस्पतीच्या पानात आरोग्याचा खजिना आहे. अनेक आजारांवर आराम देण्याचं काम हे एक पान करतं. हे पान आपल्याला सहज उपलब्ध होणाऱ्या कडुलिंबाचं आहे. याच कडुलिंबाचे फायदे जाणून घेऊया.
advertisement
2/5
आयुर्वेद चिकित्सक डॉ. दीप्ती नामदेव यांच्या मते, कडुलिंब रक्त शुद्धीकरणाचं काम करतो. अनेक आजारांवर हा रामबाण उपाय असल्याचं वैज्ञानिक संशोधनातून पुढे आलं आहे. त्यामुळेच कडुलिंबाला बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा अँटीकॅन्सर, अँटीव्हायरल, अँथेलमिंटिक आणि इम्युनोमोड्युलेटरी एजंट मानलं जातं.
advertisement
3/5
ताप, खाज सुटणे आणि इतर आजारांवर कडुलिंबाच्या सालीचा काढा गुणकारी आहे. कडुलिंब शरीराचे तापमान नियंत्रित करते आणि फ्लू सारख्या आजारांना प्रतिबंधित करते. फोड आणि पिंपल्सची तक्रार असल्यास कडुलिंबाची साल बारीक करून लावल्याने आराम मिळतो.
advertisement
4/5
जर तुम्हाला खूप ताप येत असेल तर कडुनिंबाच्या सालीचा काढा पिल्याने काही मिनिटांतच परिणाम दिसून येतो. किंबहुना आयुर्वेदात कडुलिंबाला शुध्दीकारक मानले जाते. बऱ्याच जणांना फोड आणि पिंपल्सची तक्रार असते, अशा वेळी कडुलिंबाच्या सालाची पेस्ट बनवून त्यात कापूर टाकल्याने फोड आणि मुरुमांपासून आराम मिळतो. हा एक उत्तम घरगुती उपाय आहे.
advertisement
5/5
कडुलिंबाची 4 ते 5 पाने दिवसातून एकदा चावून खाल्ल्याने शरीर निरोगी राहते आणि त्याच्या पानांची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग निघून जातात आणि चेहरा तजेलदार होतो. कडुलिंबात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. कडुलिंबाची पाने, डहाळ्या, निंबोळी, साल हे सर्वच आरोग्यासाठी गुणकारी आहे. त्यामुळेच याला सर्व रोगहारी वनस्पती मानले जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
हे एक पान खा अन् आजारांना पळवून लावा, आपल्या आसपासच आहे जीवनसत्त्वांचा खजिना