Water Bottle: उन्हाळ्यामध्ये प्लास्टिक, माती की मेटल? पाण्यासाठी कोणती बॉटल असते स्वच्छ?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Health Care Tips: पाण्याची बाटली ही रोजच्या गरजेची वस्तू आहे. अनेकांना प्लास्टिक, माती की मेटल कोणती बाटली वापरावी? असा प्रश्न पडतो.
advertisement
1/7

आपल्यापैकी अनेक जण घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत घेऊन जातात. ही एक चांगली सवय आहे. पण तुमच्यापैकी अनेक जणांना प्रश्न पडला असेल की, पाण्यासाठी प्लास्टिक, स्टेनलेस स्टील, कॉपर, काच किंवा माती यापैकी कुठली बाटली वापरावी?
advertisement
2/7
उत्तम आरोग्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या बाटली वापरण्याचा सल्ला देतात. छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ जया गावंडे यांनी पाण्याच्या बाटलीबाबत माहिती दिलीये.
advertisement
3/7
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्यासाठी तुम्ही कॉपरची म्हणजेच तांब्याच्या बाटलीचा वापर हा करू शकता. कारण तांब्याच्या भांड्यातलं पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायी असतं. तुम्ही कॉपरच्या बॉटल मधलं पाणी पिऊ शकता. पण ही बाटली घेताना चांगली बघून घ्यावी. तसेच वेळोवेळी साफ देखील करावी.
advertisement
4/7
स्टेनलेस स्टीलच्या बॉटल मधलं पाणी पिणे देखील शरीरासाठी चांगले असते. कारण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची केमिकलची रिअ‍ॅक्शन येत नाही. त्यामुळे तुम्ही त्या बॉटलमधले पाणी पिऊ शकता. तसेच ती बॉटल तुम्ही कॅरी देखील करू शकता.
advertisement
5/7
मातीच्या बॉटलमधील पाणी पिणे देखील चांगले असते. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात मातीच्या बॉटल देखील उपलब्ध आहेत. पण घराबाहेर जाताना आपण मातीची बॉटल घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही घरामध्ये असताना मातीच्या बाटलीतलं पाणी प्यावं, असं गावंडे सांगतात.
advertisement
6/7
तुम्ही काचेच्या बाटलीतलं पाणी देखील पिऊ शकता. ते देखील आरोग्यासाठी चांगलं असतं. काचेच्या बाटलीत कोणतीही रिॲक्शन होत नाही. त्यामुळे काचेची बाटली वापरासाठी चांगली असते. मात्र, ती काळजीपूर्वक वापरावी लागते.
advertisement
7/7
सध्या पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास प्लास्टिकच्या बॉटल पाहायला मिळतात. पण या बाटलीतील पाणी तुम्ही एकाच वेळेस घेऊ शकता. त्यामध्ये परत पाणी टाकून पिणे घातक असते. कारण प्लास्टिकची पाण्याची बाटली आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यासाठी बाजारातील पाण्याच्या बाटलीतलं पाणी शक्यतो टाळावं, असंही जया गावंडे सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Water Bottle: उन्हाळ्यामध्ये प्लास्टिक, माती की मेटल? पाण्यासाठी कोणती बॉटल असते स्वच्छ?