TRENDING:

'हे' पदार्थ खा! कोलेस्ट्रॉल महिन्याभरात होईल कमी, वाढल्यास येऊ शकतो Heart attack

Last Updated:
कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे मुख्य कारण असतं चुकीचा आहार आणि जीवनशैली. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की आरोग्य बिघडतं. त्यामुळे हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. रक्तवाहिन्यांना धोका पोहोचू शकतो. म्हणून शरिरात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात असणं अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
1/5
हे पदार्थ खा! कोलेस्ट्रॉल महिन्यात होईल कमी, वाढल्यास येऊ शकतो Heart attack
डॉक्टर जितेंद्र उपाध्याय सांगतात की, कमी-जास्त झालेली कोलेस्ट्रॉलची पातळी वाईट जीवनशैली दर्शवते. परंतु काळजी करू नका, आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे दैनंदिन जीवनात काही चांगल्या सवयी लावून घेतल्याने आपल्या शरिरातली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहू शकते.
advertisement
2/5
मेथीचे दाणे कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी असतात. या दाण्यांमध्ये पोटॅशियम, लोह, जस्त आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं.
advertisement
3/5
कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रात्री मेथीचे दाणे भिजवलेलं पाणी सकाळी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसंच हिरव्या भाज्यासुद्धा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त असतात.
advertisement
4/5
डॉक्टरांनी सांगितलं की, मेथीच्या दाण्यांव्यतिरिक्त धणे, व्हिनेगर, बीट, हळद, इत्यादींमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहू शकतं. आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास आणि बाहेरचे खाद्यपदार्थ टाळल्यास अवघ्या महिन्याभरात आपल्याला सकारात्मक निकाल मिळू शकतो.
advertisement
5/5
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
'हे' पदार्थ खा! कोलेस्ट्रॉल महिन्याभरात होईल कमी, वाढल्यास येऊ शकतो Heart attack
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल