Health Tips: अपचन होईल दूर, थकवा नाही जाणवणार, पावसाळ्यात हे फळ खाण्याचे गुणकारी फायदे
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
लहानपणीच्या आठवणींमध्ये या फळाला खास स्थान असलं, तरी आजही त्याचे आरोग्यदायी फायदे लक्षात घेता, पावसाळ्यात करवंदाचं सेवन करणं अत्यंत उपयुक्त ठरतं.
advertisement
1/7

पावसाळा सुरू झाला की बाजारपेठांमध्ये विविध हंगामी फळांची रेलचेल पाहायला मिळते. त्यातच काळसर-जांभळ्या रंगाचं, लहानसं पण गुणकारी फळ म्हणजे ‘करवंद’. लहानपणीच्या आठवणींमध्ये या फळाला खास स्थान असलं, तरी आजही त्याचे आरोग्यदायी फायदे लक्षात घेता, पावसाळ्यात करवंदाचं सेवन करणं अत्यंत उपयुक्त ठरतं. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
2/7
करवंद हे भारतात विशेषतः ग्रामीण भागांमध्ये सहज उपलब्ध होणारं जंगलात उगवणारं फळ आहे. पावसाळ्यात याचा हंगाम सुरू होतो.
advertisement
3/7
करवंदामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे.
advertisement
4/7
पावसाळ्यात हवामानातील बदलामुळे अपचन, सर्दी-खोकला, थकवा यांसारख्या समस्या वाढतात. अशा वेळी करवंदाचं सेवन केल्यास पाचनक्रिया सुधारते, रक्तशुद्धी होते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. यामधील अ‍ॅस्ट्रिंजंट गुणधर्म तोंड येणं, हिरड्यांमध्ये सूज येणं यावर उपयोगी ठरतात. त्यामुळे आयुर्वेदातही करवंदाला महत्त्व आहे.
advertisement
5/7
करवंदाचा उपयोग चटणी, लोणचं, सरबत, कोशिंबीर आणि अगदी कच्च्या फळांप्रमाणेही केला जातो. त्याची चव थोडी आंबटसर, तुरट आणि गोडसर असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.
advertisement
6/7
तज्ज्ञांच्या मते, जे लोक ऍसिडिटी किंवा अति पचनाच्या तक्रारींनी त्रस्त असतात, त्यांनी करवंद मर्यादित प्रमाणातच खावं. कारण अती प्रमाणात खाल्ल्यास काही जणांना त्रास होऊ शकतो.
advertisement
7/7
पावसाळ्याच्या दिवसांत बाजारात सहज उपलब्ध असलेल्या करवंद फळांचा जरूर आस्वाद घ्या आणि आरोग्यदायी लाभ मिळवा, असं आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: अपचन होईल दूर, थकवा नाही जाणवणार, पावसाळ्यात हे फळ खाण्याचे गुणकारी फायदे