किती...बारीक झालीस, सगळे हेच विचारतात? आता वजन वाढवूनच दाखवा, तेही महिन्याभरात!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
सध्या कितीही धावपळीचं जग असलं तरी सर्वांना फिट राहायचं असतं. पोट कमी कसं करावं हा मोठा प्रश्न अनेकजणांसमोर असतो. ते वजन कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. तर, काहीजणांचं वजन मात्र काही केल्या वाढतच नाही. कितीही खाल्लं तरी वजन काटा पुढे सरकतच नाही. तुम्ही यापैकीच एक असाल तर आता अजिबात घाबरू नका, आज आपण एक रामबाण उपाय पाहणार आहोत. (रुपांशू चौधरी, प्रतिनिधी)
advertisement
1/7

वजन कमी किंवा जास्त होणं हे फक्त एका योग्य डायटमुळे शक्य होतं. काही अशा ड्रिंक्स आहेत, ज्या प्यायल्याने शरिरातले हेल्थी फॅट्स वाढतात. परिणामी वजन वाढतं आणि आपण फिट राहतो.
advertisement
2/7
डॉ. उदय कुमार सिंह यांनी सांगितलं की, ज्यांच्या शरिरातलं मेटाबॉलिज्मचं प्रमाण चांगलं असतं त्यांच्या शरिरात फॅटचा टिकाव लागत नाही. त्यामुळे त्यांचं वजन कमी होतं. परंतु यावरही उपाय आहेच.
advertisement
3/7
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, केळ्याचा रस शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. यामुळे केवळ वजन वाढत नाही, तर चेहऱ्यावर छान तेजही येतं. शिवाय हृदयाचं आरोग्यही सुदृढ राहतं. हाडंसुद्धा मजबूत होतात. तसंच अन्नपचन सुरळीत होतं. दररोज दोन केळ्यांचा शेक प्यायल्यास वजन वाढतं पण त्यात साखर नाही, मध घालायचं.
advertisement
4/7
आता बाजारात आंबे यायला सुरुवात होईल. आंब्याचा शेक वजनवाढीसाठी फायदेशीर असतो. त्यात तुम्ही अननसाचा रसही घालू शकता. या दोन्ही फळांमध्ये भरपूर कॅलरीज असतात त्यामुळे वजन वेगाने वाढतं.
advertisement
5/7
खजूरही वजन वाढीसाठी उपयुक्त मानलं जातं. खजुराचा रस प्यायल्यास रक्तभिसरण व्यवस्थित होतं. मात्र दररोज दोन ते चार खजुरांचा शेक प्यावा, त्यापेक्षा जास्त खजूर खाल्ल्यास त्रास होऊ शकतो.
advertisement
6/7
चिकूमध्ये व्हिटॅमिन ए, मेटाबॉलिज्म आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं. त्यातून शरिराला हेल्थी फॅट मिळतात. त्यामुळे वजन वाढतं आणि शरीर सुदृढ राहतं.
advertisement
7/7
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
किती...बारीक झालीस, सगळे हेच विचारतात? आता वजन वाढवूनच दाखवा, तेही महिन्याभरात!