Acidity Gas ! अॅसिडीटी असो वा गॅस, 10 मिनिटांत आराम; हिंगोलीच्या डॉक्टरांनी सांगितलाय मॅजिकल उपाय
- Published by:Priya Lad
Last Updated:
Home Remedies For Acidity And Gas : गॅस आणि अॅसिडीटीची समस्या कित्येकांना आहे. ज्यावर लोक गोळ्या घेतात. पण हिंगोलीच्या डॉक्टरने यावर घरगुती उपाय सांगितला आहे.
advertisement
1/9

बदलती आणि बैठी जीवनशैली, कामाचा वाढता ताण, हेव्ही डाएट, अवेळी जेवण, बाहेरचं खाणं यामुळे अॅसिडीटी आणि गॅसची समस्या वाढत चालली आहे. कित्येकांना ही समस्या आहे आणि कित्येक जण यावर गोळ्या घेतात.
advertisement
2/9
पण हिंगोलीच्या एका डॉक्टरने प्रत्येकाच्या किचनमध्ये उपलब्ध असेलल्या फक्त 3 पदार्थांपासून एक असं मॅजिकल ड्रिंक तयार केलं आहे, ज्यामुळे 10 मिनिटांत अॅसिडीटी आणि गॅसपासून आराम मिळेल.
advertisement
3/9
आता किचनमधील हे पदार्थ कोणते तर बडीशेप, जिरं आणि छोटी वेलची. 4 वेलची, एक चमचा बडिशेप, एक चमचा जिरे, 300 मिली म्हणजे एक ग्लास पाणी इतकं तुम्हाला लागणार आहे.
advertisement
4/9
बडीशेपमध्ये अँटासीड घटक आहे, जो आपल्या शरीरातील एक्स्ट्रा अॅसिडला न्यूट्रिलाइझ करायचं काम करतं. अन्नपचनासाठी लागणारं पाचक रस तयार करण्यात मदत करते. त्यामुळे अन्नपचन शक्ती मजबूत बनते.
advertisement
5/9
छोटी वेलची आतड्यांची हालचाल वाढवते. पाचक रस अन्नपदार्थात लवकर मिक्स होतो आणि अन्न लवकर पचतं. आतड्यांच्या हालचालीमुळे अन्न लवकर खाली सरकतं आणि पोटातील जडपणा कमी होतो, पोट रिकामी होतं.
advertisement
6/9
जिऱ्यामुळे अॅसिडीटी, गॅस, ब्लोटिंग, पोटातील क्रॅम्स कमी होतात. ज्यांना पोटदुखी आहे, त्यांच्यासाठी जिरे रामबाण उपाय आहेत.
advertisement
7/9
भांड्यात पाणी घेऊन त्यात बडीशेप, जिरं, छोटी वेलची टाकून भांडं गॅसवर ठेवा. हाय फ्लेमवर वाफ येईपर्यंत उकळून घ्या. एक उकळी आली की गॅसची आच मंद करून 10 मिनिटं मंद आचेवर उकळून घ्या. आता काढा गाळून घ्या.
advertisement
8/9
10 मिनिटांत तयार होणारा हा काढा. ज्यांना अॅसिडीटी, गॅसची समस्या आहे त्यांनी दिवसातून एकदा आणि जे यासाठी दररोज गोळ्या घेतात त्यांनी जड पदार्थांच्या सेवनानंतर दिवसातून दोनदा 25 दिवस हा काढा घ्यावा, असा सल्ला आयुर्वेदिक डॉक्टर पूजा पवनगिरी यांनी दिला आहे.
advertisement
9/9
सूचना : हा लेख डॉक्टरांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Acidity Gas ! अॅसिडीटी असो वा गॅस, 10 मिनिटांत आराम; हिंगोलीच्या डॉक्टरांनी सांगितलाय मॅजिकल उपाय