2016 Trend : सेलिब्रिटी का शेअर करतायेत 2016 सालातील फोटो; म्हणे, '2026 हे नवीन 2016', म्हणजे नेमकं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
2016 Photo Trend : तुम्ही गेल्या काही दिवसांत इन्स्टाग्रामवर पाहिलं असेल तुम्हाला बहुतेक सेलिब्रिटींनी त्यांचे 2016 सालातील फोटो शेअर केले आहेत. 2016 सालातील फोटोचा हा ट्रेंड चांगलाच व्हायरल होतो आहे.
advertisement
1/7

बहुतेक सेलिब्रिटी आपल्या लहानपणाचे किंवा एखाद्या फिल्म, सीरिअल्सच्या आठवणीत त्या वेळचे थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. आपणही आपले असे फोटो शेअर करतो. पण सध्या सोशल मीडियावर थ्रोबॅक फोटोचा एक वेगळचा ट्रेंड सुरू आहे. 2016 चा हा फोटो ट्रेंड.
advertisement
2/7
सेलिब्रिटी आणि बरेच इन्स्टाग्राम युझर 2016 सालातील आपले फोटो शेअर करत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोशल मीडिया डिजिटल टाईम कॅप्सूलमध्ये बदलला आहे. 2026 हे नवीन 2016 आहे, असं कॅप्शन या फोटोंना दिलं जातं आहे.
advertisement
3/7
अभिनेत्री करिना कपूर, आलिया भट्ट, सोनम कपूर, अनन्या पांडे अशा कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांचे 2016 सालातील फोटो शेअर केलेले तुम्ही पाहिले असतील. 2016 वर्षात असं काय होते, त्या वर्षातील हे फोटो इतके खास का आहेत, 2016 सालातील फोटोंचा हा ट्रेंड नेमका काय आहे? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील.
advertisement
4/7
हा ट्रेंड म्हणजे 10 वर्षांपूर्वीचं डिजीटल युग. 2016 साली इन्स्टाग्रामवर आतासारखा दिखाऊ कंटेंट नव्हता, जास्त फिल्टर्स नव्हते. आजचं सोशल मीडिया इतकं क्युरेटेड आणि आर्टिफिशिअल बनलं आहे. प्रत्येक फोटो परफेक्ट असावा, त्यातील लाइट योग्य असावी, कॅप्शनचा खोल अर्थ असावा असं असतं. पण 2016 हा असा काळ होता जेव्हा लोक कोणत्याही दबावाशिवाय फोटो पोस्ट करायचे.
advertisement
5/7
भारतीयांसाठी 2016 हे फक्त एक वर्ष नाही, तर आठवणींचा खजिना आहे. तो असा काळ होता जेव्हा प्रत्येक घरात डबस्मॅश व्हिडिओ तयार केले जात होते आणि स्नॅपचॅट फिल्टर्स लोकप्रिय होतं.
advertisement
6/7
मानसिकदृष्ट्या 10 वर्षे पूर्ण करणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 2016 मध्ये टिनएजर असलेले आता त्यांच्या करिअर आणि जबाबदाऱ्यांमध्ये बिझी आहेत. त्यांच्यासाठी हा ट्रेंड त्यांच्या बालपणाशी जोडण्याचा एक मार्ग.
advertisement
7/7
'2026 हा नवीन 2016 आहे' हा ट्रेंड फक्त फोटोंचा संग्रह नाही तर जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा एक मार्ग आहे. या ट्रेंडच्या नावाखाली, लोक त्या गोष्टी आठवत आहेत ज्या आता विसरल्या गेल्या आहेत. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2016 Trend : सेलिब्रिटी का शेअर करतायेत 2016 सालातील फोटो; म्हणे, '2026 हे नवीन 2016', म्हणजे नेमकं काय?