TRENDING:

Healthy Living : फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न किती दिवस खाण्यास योग्य? गृहिणींनो काय करावं आणि काय करु नये लगेच जाणून घ्या

Last Updated:
अनेक घरांमध्ये उरलेलं अन्न फ्रिजमध्ये दिवसन्‌दिवस ठेवण्याची सवय आहे, पण ही सवय आरोग्यासाठी किती सुरक्षित आहे हे जाणून घ्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून
advertisement
1/9
फ्रिजमधील अन्न किती दिवस खाण्यास योग्य? काय करावं आणि काय करु नये जाणून घ्या
उरलेलं अन्न दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसांनी खाणं ही गोष्ट जवळजवळ प्रत्येक घरात सामान्य झाली आहे. फ्रीजमध्ये जेवण फ्रेशच राहातं असा अनेक गृहिणींचा समज आहे. पण खरंतर हा एक गैरसमज आहे. ठरावीक दिवसापर्यंत ठेवलेली वस्तू फ्रेश रहाते किंवा खाण्यायोग्य असते. पण त्यानंतर मात्र ती वस्तू फेकून द्यावी लागते.
advertisement
2/9
मग आता प्रश्न असा की फ्रिजमध्ये अन्न किती दिवस टिकतं?
advertisement
3/9
USDA आणि Mayo Clinic सारख्या संस्थांच्या मते, शिजवलेलं अन्न योग्य प्रकारे थंड करून फ्रिजमध्ये ठेवल्यास ते 3 ते 4 दिवसांपर्यंतच सुरक्षित असतं. त्यानंतर त्यात बॅक्टीरिया वाढण्याचा धोका वाढतो.
advertisement
4/9
शाकाहारी पदार्थ (भाज्या, डाळी) या 5 दिवसांपर्यंत तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. तर मांसाहारी पदार्थ, अंडी, डेअरी पदार्थ हे 3 दिवसांपर्यंत ठेवणं सुरक्षीत आहे.
advertisement
5/9
जर अन्न जास्त काळ ठेवायचं असेल तर ते लगेच फ्रीझमध्ये ठेवणं सुरक्षित आहे. फ्रीझरमध्ये -१८°C तापमानात अन्न 2 ते 6 महिने टिकतं, पण चव आणि पोत थोडं बदलू शकतं.
advertisement
6/9
अनेक घरांमध्ये अन्न शिजवल्यानंतर बराच किचनमध्ये असंच ठेवलं जातं आणि नंतर फ्रिजमध्ये ठेवतात. हे चुकीचं आहे. 2 तासांपेक्षा जास्त वेळ अन्न रूम टेम्परेचरवर ठेवलं तर त्यात बॅक्टीरिया झपाट्याने वाढतात आणि नंतर फ्रिजमध्ये ठेवलं तरी ते पूर्णपणे सुरक्षित राहत नाही.
advertisement
7/9
फ्रिजमध्ये अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्सअन्न शिजवल्यानंतर ते लगेच एअर टाइट कंटेनरमध्ये फ्रिजमध्ये ठेवा.काचच्या डब्यांचा वापर करा.डब्यावर तारीख लिहून ठेवा, जेणेकरून योग्य वेळी वापरता येईल.रॉ मासे, मांस, अंडी 1-2 दिवसांसाठी फ्रीझ करा.फळं-भाज्या साधारण 4-5 दिवसांत वापरा.
advertisement
8/9
शेवटी काय लक्षात ठेवावं?फ्रिज हे अन्न काही दिवस ताजं ठेवण्यासाठी उत्तम आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण आठवडाभर जुने पदार्थ खाऊ शकतो. सुरक्षितता, चव आणि आरोग्यासाठी अन्न 3-4 दिवसांतच संपवणं, गरजेप्रमाणे फ्रीझ करणं आणि स्वच्छ डब्यांचा वापर करणं हीच योग्य पद्धत आहे.
advertisement
9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Healthy Living : फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न किती दिवस खाण्यास योग्य? गृहिणींनो काय करावं आणि काय करु नये लगेच जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल