TRENDING:

Ginger Tea recipe : चहात आलं कसं टाकायचं, किसून की ठेचून, कोणती पद्धत योग्य?

Last Updated:
Ginger Tea recipe : आल्याचा चहा अनेक जण आवडीने पितात. तुम्ही चहामध्ये आलं कसं टाकता यावरही त्या चहाची चव अवलंबून असते. किसून आणि ठेचून, यापैकी चहात आलं टाकण्याची कोणती पद्धत योग्य असावी असं तुम्हाला वाटतं?
advertisement
1/7
Ginger Tea recipe : चहात आलं कसं टाकायचं, किसून की ठेचून, कोणती पद्धत योग्य?
कित्येक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. तर काही लोकांचा दिवस चहा प्यायल्याशिवाय पूर्ण होतच नाही.
advertisement
2/7
सामान्यपणे चहा म्हणजे त्यात पाणी, साखर आणि चहा पावडर. पण चहाची चव वाढण्यासाठी त्यात वेलची, आलंही टाकलं जातं.
advertisement
3/7
थंडीत आणि सर्दी-खोकला झाला असेल तर आल्याचा चहा उत्तम. आलं आरोग्यासाठी चांगलं. पण चहामध्ये आलं कसं टाकावं हे तुम्हाला माहिती आहे का? चहामध्ये आलं टाकण्याच्या पद्धतीवरही चहाची चव अवलंबून आहे.
advertisement
4/7
काही लोक चहामध्ये आलं किसून टाकतात तर काही ठेचून. दोन्ही पद्धतीने चहा बनवून पाहिलात तर तुम्हाला चहाची चव बदललेली वाटेल.
advertisement
5/7
चहासाठी आल्याचा रस हवा असतो. चहात आलं ठेचून टाकल्याने त्याचा रस चहामध्ये उतरतो. याउलट आलं किसून टाकलं तर आल्याचे फायबर चहामध्ये उतरतात. चहाची चव आणि सुगंध अधिक तीव्र होतो. चहा कडू लागतो.
advertisement
6/7
त्यामुळे आल्याचा चहा बनवताना त्यात आलं किसून टाकण्याऐवजी ठेचून टाकणं चांगलं.
advertisement
7/7
तुम्ही कोणत्या पद्धतीने आल्याचा चहा बनवता आणि त्याची चव कशी? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ginger Tea recipe : चहात आलं कसं टाकायचं, किसून की ठेचून, कोणती पद्धत योग्य?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल