Chef Kitchen Tips : नारळ वाकडातिकडा फुटतो, शेफ कुणाल कपूरने दाखवली नारळ फोडण्याची योग्य पद्धत
- Published by:Priya Lad
Last Updated:
How To Break Coconut : नारळ फोडण्यासाठीही स्किल असावं लागतं. सगळ्यांनाच नारळ फोडणं जमत नाही आणि ज्यांना जमतं त्यांनाही ते नीट येत नाही. शेफ कुणाल कपूर यांनी नारळ कसा फोडायचा हे दाखवलं आहे.
advertisement
1/5

तुम्ही नारळ फोडत असाल तर एक गोष्ट पाहिली असेल एकतर तो एक लहान एक मोठा असा फुटतो किंवा वाकडातिकडा फुटतो. पण नारळ फोडण्याची अशी ट्रिक की तो बरोबर मधेच फुटेल.
advertisement
2/5
शेफ कुणाल कपूर यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर परफेक्ट नारळ कसा फोडायचा हे दाखवलं आहे. नारळ फोडण्याची सगळ्यात सोपी ट्रिक त्यांनी दाखवली आहे.
advertisement
3/5
शेफ कुणाल कपूरने सांगितल्यानुसार नारळाच्या वरचा किस काढून घ्या. तुम्ही नारळ नीट पाहाल तर त्यावर तुम्हाला 3 नैसर्गिक लाइन दिसतील. नारळाच्या मधोमध याच लाइनवर तुम्हाला सतत मारायचं आहे.
advertisement
4/5
तुम्ही पाहाल काही वेळ मारल्यानंतर नारळ अगदी मधून तुटेल त्याचे दोन तुकडे होतात. आता प्रश्न नारळातील खोबरं काढण्याचा. तर सामान्यपणे आपण त्यात चाकू किंवा सुरी टाकून ते काढण्याचा प्रयत्न करतो पण यामुळे खोबरं तुटून तुटून बाहेर येतं.
advertisement
5/5
तर यासाठी शेफ कुणाल कपूर यांनी एकदम सोपी ट्रिक सांगितली आहे. ज्यात त्यांनी खोबऱ्याची फोडलेली वाटी काही वेळ गॅसवर गरम ठेवायला सांगितली आहे. थोड्या वेळाने ही वाटी एका कापडात घ्या आणि आता सुरी किंवा चाकू फक्त हलका फिरवा. तुम्ही पाहाल खोबरं अख्खच्या अख्खं बाहेर येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chef Kitchen Tips : नारळ वाकडातिकडा फुटतो, शेफ कुणाल कपूरने दाखवली नारळ फोडण्याची योग्य पद्धत