TRENDING:

Kitchen Tips : कुकरला किती शिट्ट्या करायच्या हे कसं ठरवायचं? वापरा या 5 ट्रिक

Last Updated:
How to Decide Cooker whistles : बहुतेक लोक कुकर वापरतात. सामान्यपणे कुकरला 3 शिट्ट्या केल्या जातात. पण कुकरच्या शिट्ट्या पदार्थ, पाण्याचं प्रमाण, फ्लेम, कुकरचा आकार यानुसार बदलतं.
advertisement
1/7
Kitchen Tips : कुकरला किती शिट्ट्या करायच्या हे कसं ठरवायचं? वापरा या 5 ट्रिक
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत झटपट स्वयंपाक करायचा तर कुकरचा आधार. कुकरमुळे जेवण पटापट होतं. जवळपास सगळ्यात घरात तुम्हाला कुकर पाहायला मिळेल. सामान्यपणे कुकरमध्ये भात शिजवला जातो. याशिवाय डाळ आणि इतर पदार्थही शिजवले जातात.
advertisement
2/7
तसं कुकरमध्ये भात करायचा तर 2-3 शिट्ट्या केल्या जातात हे आपल्याला माहिती आहे. आपल्या आजीने, आईने ते शिकवलं आणि आपण तेच फॉलो करतो. पण इतर पदार्थ करायचे तर किती शिट्ट्या करायच्या? कुकरला किती शिट्ट्या करायच्या हे कसं समजतं किंवा ठरवायचं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
advertisement
3/7
कुकरची शिट्टी किती वेळा घ्यायची हे ठरवताना फक्त अंदाज नाही, तर अन्नाचा प्रकार, भिजवणं, पाण्याचं प्रमाण आणि आचेची तीव्रता हे सगळे घटक महत्त्वाचे असतात.
advertisement
4/7
तांदळासाठी 1-2, डाळीसाठी 2-3, भाजीसाठी 1-2, हरभरा-राजमा-चणे अशी कडधान्य असतील तर 4-6 आणि मटणासाठी 5-7 शिट्ट्या. यापेक्षा कठीण पदार्थ असतील तर अधिक शिट्ट्या कराव्या लागती. डाळ किंवा कडधान्य भिजवलेले असतील तर शिट्ट्या कमी करायच्या आणि भिजवलेले नसतील तर जास्त शिट्ट्या. उदा. भिजवलेला हरभरा असेल तर 3-4 शिट्ट्या आणि तो भिजवलेला नसेल तर 5-6 शिट्ट्या.
advertisement
5/7
तुम्ही किती पाणी टाकलं आहे यावरही शिट्ट्या अवलंबून आहेत. पाणी जास्त असेल तर दाब तयार व्हायला वेळ लागतो, शिट्ट्या थोड्या उशिरा आणि पाणी कमी असेल तर शिट्टी लवकर. पाण्याचं प्रमाण योग्य असेल तर शिट्ट्यांचा अंदाज अचूक येतो. गॅसच्या फ्लेमवरही शिट्ट्यांची संख्या अवलंबून आहे. फ्लेम मोठी असेल तर शिट्ट्या लवकर होतात पण अन्न आतून कच्चं राहण्याची शक्यता असते. मध्यम आचेवर समान शिजतं. त्यामुळे शिट्टी झाली की आच कमी करणं उत्तम.
advertisement
6/7
कुकरचा प्रकार आणि आकारही लक्षात घ्यायला हवा. मोठा कुकर असेल तर शिट्ट्या व्हायला जास्त वेळ, लहान कुकर असेल तर कमी वेळात शिट्ट्या. जुना कुकर असेल तर जास्त शिट्ट्या कराव्या लागू शकतात. काही अनुभवी गृहिणी शिट्ट्यांऐवजी वेळ पाहतात. म्हणजे एक शिट्टी साधारणपणे 2–3 मिनिटे आणि 3 शिट्ट्या सुमारे 7–8 मिनिटे.
advertisement
7/7
कुकरची शिट्टी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.पहिली शिट्टी झाल्यावर आच कमी करा, कुकर लगेच उघडू नका, शिट्टी म्हणजे शिजलं असंच नाही, आत वेळ द्यावा लागतो, शंका असेल तर 1 शिट्टी कमी करा, अन्नपदार्थ किती शिजले ते पाहून नंतर ठरवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : कुकरला किती शिट्ट्या करायच्या हे कसं ठरवायचं? वापरा या 5 ट्रिक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल