TRENDING:

Mango : आंबा गोड आहे की आंबट, न कापता कसं ओळखाल? विकत घेताना या 4 ट्रिक्स येतील कामी

Last Updated:
सध्या आंब्यांचा सीझन सुरु असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक झालेली आहे. तेव्हा आंबेप्रेमींची पावलं आपसूकच आंब्यांच्या दुकानाकडे वळतात. अनेकदा खरेदी केलेले आंबे बाहेरून पिकलेले दिसत असले तरी चवीला मात्र आंबट असतात. तेव्हा आंबे खरेदी करताना काही ट्रिक्स वापरल्या तर तुम्हाला न कापताही आंबा गोड आहे की आंबट लगेच कळले.
advertisement
1/6
आंबा गोड आहे की आंबट, न कापता कसं ओळखाल? विकत घेताना या 4 ट्रिक्स येतील कामी
आंबा खरेदी करण्यापूर्वी त्याच्या सालीचा रंग नीट तपासा. जर आंबा नैसर्गिकपणे पिकवलेला असेल तर त्याच्या सालीवर एकही डाग नसतो. पण जर आंबा रसायनांमध्ये पिकवलेला असेल तर सालीवर काळे डाग असतात. त्यामुळे रंगांवरून आंबा आतून गोड आहे की आंबट ते लगेच ओळखू शकता.
advertisement
2/6
आंबा खरेदी करताना त्याच्या देठाकडील भागावर लक्ष द्या. जर देठाकडील भाग थोडा दाबल्या सारखा आणि इतर सर्व भाग फुगीर आणि मऊ असेल तर आंबा हा छान पिकलेला आणि गोड आहे असे समजावे.
advertisement
3/6
आंबा खरेदी करण्यापूर्वी त्याचा नीट वास घेऊन पाहा. जर आंब्यातून गोड आणि फ्रेश वास येत असेल तर तो आंबा नैसर्गिक आहे असं समजावं. त्याउलट फळाला रसायनांचा वास येत असल्यास तो बिलकुल खरेदी करू नयेत.
advertisement
4/6
आंबा विकत घेताना तो जास्त कडक किंवा जास्त नरम नाही तेही तपासा. जर <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/how-to-identify-mango-which-looks-good-from-outside-but-bad-from-inside-know-the-tricks-in-marathi-mhpp-1169150.html">आंबा</a> जास्त कडक असेल तर तो आंबट असण्याची शक्यता असेल तसेच आंबा जास्त मऊ असल्यास तो आतून खराब असण्याची शक्यता असते.
advertisement
5/6
आंब्याला कुठेही छिद्र असतील किंवा तो फुटलेला असेल तर असा आंबा खरेदी करणं टाळावं. तसेच आंबा पूर्ण पिकला तर त्याच्या सालीला सुरकुत्या पडलेल्या असतात असे आंबे आतून गोड असतात.
advertisement
6/6
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mango : आंबा गोड आहे की आंबट, न कापता कसं ओळखाल? विकत घेताना या 4 ट्रिक्स येतील कामी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल