Tips And Tricks : तेल, चहा-कॉफी, शाहीसारखे जिद्दी डाग कसे काढायचे? 'या' ट्रिक्स वापरा, सोपं होईल तुमचं काम!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Tricks to remove hard stains from cloths : कपड्यांवर पडलेले तेल, चहा-कॉफी आणि शाहीचे डाग काढणं हे खूप अवघड आणि मोठा काम असतं. हे डाग एकत्र निघताच नाहीत किंवा ते काढण्यासाठी पाल्याला खूप मेहनत आणि वेळी खर्च करावा लागतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अशा काही ट्रिक्स घेऊन आलो आहोत, ज्या काही वेळातच हे जिद्दी डाग काढण्यासाठी तुमची मदत करू शकतात.
advertisement
1/7

बऱ्याचदा अनावधानाने आपल्या कपड्यांवर अन्नाचे डाग पडतात. काही डाग त्वरित धुतले तर निघून जातात, पण काही डाग हलके झाले तरी कपड्यांवर त्यांची छाप सोडून जातात. अशात जर कपडे फिक्या रंगाचे असतील तर ते अजून वाईट दिसतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हे डाग घालवण्यासाठी काही सोपे उपाय सांगत आहोत.
advertisement
2/7
लिपस्टिकचा डाग : तुमच्या कपड्यांवर लिपस्टिकचा डाग पडला असेल तर तो घालावण्यासाठी एक बेस्ट उपाय आहे. तो म्हणजे हेअरस्प्रे.. लिपस्टिकमधील तेल आणि मेण कापडाच्या बारीक तंतूंना चिकटते. लिपस्टिकचे डाग काढण्यासाठी त्या भागावर थोडासा हेअरस्प्रे स्प्रे करा आणि १०-१५ मिनिटानंतर धुवा. डाग हळूहळू निघेल.
advertisement
3/7
तेलाचे डाग : तेलाचे डाग काढण्यासाठी टॅल्कम पावडर फायदेशीर ठरू शकते. कपड्यांवर तेल लागले असेल तर ते थेट पाण्यात बुडवण्याआधी त्या डागावर टॅल्कम पावडर, खडू पावडर किंवा कॉर्नस्टार्च शिंपडा. हे सर्व तेल शोषून घेतात. अर्ध्या तासानंतर डाग ब्रशने घासून काढा. नंतर डिशवॉशिंग लिक्विडने हा भाग स्वच्छ करा.
advertisement
4/7
चहा किंवा कॉफीचे डाग : चहा कॉफीचे डाग काढण्यासाठी थंड पाणी उत्तम उपाय आहे. कपड्यांवर चहा किंवा कॉफी सांडल्यास त्यावर त्वरित थंड पाणी घाला, याने नक्कीच मदत होईल. पण जर डाग काही दिवस जुना असेल तर पांढरा व्हिनेगर आणि पाण्याचे द्रावण तयार करून डागावर १० मिनिटं लावा. नंतर कोमट पाण्याने धुवा. तुमच्याकडे व्हाईट व्हिनेगर नसेल तर तुम्ही बेकिंग सोडाची पेस्टदेखील वापरू शकता.
advertisement
5/7
शाईचे डाग : तुम्हाला आश्चर्य वाटेल पण शाईचे डाग काढण्यासाठी दूध किंवा सॅनिटायझर खूप उपयुक्त ठरतात. कपड्यांवर पडलेले शाईचे डाग काढण्यासाठी हँड सॅनिटायझर किंवा नेल पॉलिश रिमूव्हर वापरा. कापसावर थोडे सॅनिटायझर घेऊन डागावर हळूवारपणे लावा. याने डाग निघेल.
advertisement
6/7
शाईचे डाग : दूध वापरूनही तुम्ही कपड्यांवरचे शाईचे डाग काढू शकता. यासाठी शाईचे डाग असलेला भाग रात्रभर दुधात भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे धुवा. याने शाईचा डाग पूर्णपणे निघेल.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : तेल, चहा-कॉफी, शाहीसारखे जिद्दी डाग कसे काढायचे? 'या' ट्रिक्स वापरा, सोपं होईल तुमचं काम!