ना झिम्बाब्वे... ना पाऊस, कुठे झाला ऑस्ट्रेलियाचा घात? 821 दिवसांपूर्वीच लिहिलं होतं भविष्य!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 चा सगळ्यात मोठा उलटफेर झाला आहे. एकेकाळची वर्ल्ड चॅम्पियन असलेली ऑस्ट्रेलिया यंदाच्या वर्ल्ड कपमधून ग्रुप स्टेजलाच बाहेर झाली आहे.
advertisement
1/7

आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे दोन्ही टीमना एक-एक पॉईंट दिला गेला. याचसोबत ऑस्ट्रेलियाचं टी-20 वर्ल्ड कपचं आव्हान पहिल्या राऊंडमध्येच संपुष्टात आलं, त्यामुळे आता कांगारू श्रीलंकेमधूनच घरी परतणार आहेत.
advertisement
2/7
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने आयर्लंडविरुद्ध 67 रननी दणदणीत विजय मिळवला. यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाला एका मागोमाग एक धक्के बसले. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 23 रननी पराभव झाला.
advertisement
3/7
झिम्बाब्वेने धूळ चारल्यानंतर ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेविरुद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय गरजेचा होता, पण पथुम निसांकाच्या वादळी शतकासमोर ऑस्ट्रेलियाची धूळधाण उडाली आणि श्रीलंकेने सामना 8 विकेटने जिंकला.
advertisement
4/7
झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचं सुपर-8 मध्ये क्वालिफाय होणं आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या सामन्यावर अवलंबून होतं. या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव झाला असता, तर ऑस्ट्रेलियाला सुपर-8 ला जायची संधी होती. पण मॅच रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर झाली.
advertisement
5/7
ऑस्ट्रेलियाने 19 नोव्हेंबर 2023 ला वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव केला. यानंतर 821 दिवस झाले तरी ऑस्ट्रेलियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचं आव्हान सुपर-8 मध्येच संपुष्टात आलं.
advertisement
6/7
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सेमी फायनलमध्ये भारताविरुद्ध पराभव झाला. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आता टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्येही ऑस्ट्रेलियाचा गेम ओव्हर झाला.
advertisement
7/7
वनडे वर्ल्ड कपनंतर पुढच्या 4 आयसीसी ट्रॉफींमध्ये ऑस्ट्रेलियाची कामगिरी निराशाजनक झाली. वनडे वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यावर मिचेल मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवला. ट्रॉफीवर पाय ठेवून अपमान केल्यामुळे त्यानंतर ऑस्ट्रेलियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही, अशा प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट चाहते देत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
ना झिम्बाब्वे... ना पाऊस, कुठे झाला ऑस्ट्रेलियाचा घात? 821 दिवसांपूर्वीच लिहिलं होतं भविष्य!