
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे १८०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली 'महार वतन' जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता. या जमीन व्यवहारामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारीनंतर, राज्य सरकारने महसूल सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती.चौकशी समितीने पार्थ पवार यांना या प्रकरणात 'अभय' दिले आहे. जमिनीच्या खरेदी-विक्री प्रक्रियेत त्यांच्यावर ठेवण्यात आलेले ठपके पुराव्याअभावी टिकू शकले नसल्याचे समजते.या अहवालामुळे पार्थ पवार यांच्यावरील आरोपांचे मळभ दूर झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, आगामी राज्यसभा उमेदवारीसाठी पार्थ पवार यांच्या नावाचा विचार सुरू असतानाच, या अहवालाने त्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा केल्याची चर्चा रंगू लागली आहे.