Suryakumar Yadav : टी-20 वर्ल्ड कप जिंकला तर सूर्याचं स्वप्न अपूर्णच राहणार! पुन्हा ऑस्ट्रेलिया ठरली कारण, पाहा काय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Suryakumar Yadav dream T20 World Cup 2026 : सूर्याने पत्रकारांच्या या प्रश्नावर भन्नाट उत्तर दिलं होतं. मला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 ची फायनल ऑस्ट्रेलियाविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळायला आवडेल, असं सूर्यकुमार यादव म्हणाला होता.
advertisement
1/7

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजच्या सामन्यांचा शेवट जवळ आला आहे. सुपर 8 मध्ये पोहोचणाऱ्या आठ संघांपैकी सात संघ फिक्स झाले आहे. त्यामुळे टीम इंडियाचं सुपर 8 मधील शेड्युल देखील फिक्स झालंय.
advertisement
2/7
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलसाठी टीम इंडिया फेवरेट मानली जात आहे. पण वर्ल्ड कपच्या आधी न्यूझीलंडने भारत दौरा केला होता, त्याआधी सूर्यकुमार यादवला एक प्रश्न विचारण्यात आला होता.
advertisement
3/7
जर टीम इंडिया 2026 मध्ये टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गेली तर तुला फायनलमध्ये कोणत्या संघाविरुद्ध आणि कुठं खेळायला आवडेल, असा सवाल सूर्यकुमार यादवला विचारण्यात आला होता.
advertisement
4/7
सूर्याने पत्रकारांच्या या प्रश्नावर भन्नाट उत्तर दिलं होतं. मला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 ची फायनल ऑस्ट्रेलियाविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळायला आवडेल, असं सूर्यकुमार यादव म्हणाला होता.
advertisement
5/7
सूर्यकुमारच्या या उत्तराने अनेकांना 2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलची आठवण आली होती. अशातच आता कॅप्टन सूर्याचं हे स्वप्न पुन्हा अपूर्णच राहणार आहे. त्याला कारण ठरली ऑस्ट्रेलिया...
advertisement
6/7
पावसामुळे झिम्बॉब्वे आणि आर्यलँडच्या संघाला एक पाईंट मिळाल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 मधून बाहेर झाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये असू शकणार नाही. अशातच सूर्याचं स्वप्न अपूरंच राहणार आहे.
advertisement
7/7
दरम्यान, ऑस्ट्रेलिया टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर गेल्याने श्रीलंका आणि झिम्बॉब्वे हे दोन्ही संघ सुपर 8 साठी क्वालिफाय झाले आहेत. आता भारताच्या ग्रुपमध्ये वेस्ट इंडिज, साऊथ अफ्रिका आणि झिम्बॉब्वे हे तीन संघ आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : टी-20 वर्ल्ड कप जिंकला तर सूर्याचं स्वप्न अपूर्णच राहणार! पुन्हा ऑस्ट्रेलिया ठरली कारण, पाहा काय?