TRENDING:

Salman Khan: 'तो त्याच्या सोयीनुसार मुलींना...' सलीम खान यांनी सांगितलेलं सलमानने लग्न न करण्याचं खरं कारण

Last Updated:
Salman Khan Marriage: सलमानच्या लग्नाबाबत सलीम खान यांनी दिलेली एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
advertisement
1/10
सलीम खान यांनी सांगितलेलं सलमानने लग्न न करण्याचं खरं कारण
सध्या संपूर्ण खान परिवार चिंतेत आहे, कारण ९० वर्षीय दिग्गज लेखक सलीम खान यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
2/10
आज मंगळवारी सकाळी ८:३० च्या सुमारास सलीम खान यांना श्वसनाचा त्रास आणि चक्कर येत असल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या मते, त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ (Blood Clot) आढळून आली असून त्यांना सध्या ICU मध्ये ठेवण्यात आले आहे.
advertisement
3/10
बातमी कळताच सलमान खानने त्याचे सर्व प्रोजेक्ट्स बाजूला सारले आणि तो रुग्णालयात पोहोचला. अरबाज, सोहेल आणि अलविरासह संपूर्ण कुटुंब सध्या लीलावती रुग्णालयात आहे.
advertisement
4/10
या दरम्यान, सलमानच्या लग्नाबाबत सलीम खान यांनी दिलेली एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बॉलीवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खान याच्या आयुष्यात आजवर अनेक हिरोईन्स आल्या आणि गेल्या, पण ५९ व्या वर्षीही भाईजान अजूनही सिंगलच आहे.
advertisement
5/10
सलमानच्या लग्नाचा प्रश्न हा जणू संपूर्ण भारताचा 'नॅशनल प्रश्न' बनला आहे. यावर वडील सलीम खान यांनी एकदा कोमल नाहटा यांच्याशी बोलताना अत्यंत मार्मिक भाष्य केलं होतं.
advertisement
6/10
सलीम खान म्हणाले होते, "सलमानला प्रेम मिळवण्यात अपयश येण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याची मानसिकता. तो ज्या मुलीच्या प्रेमात पडतो, लग्नानंतर तिच्यामध्ये तो आपल्या आईला शोधू लागतो."
advertisement
7/10
त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, सलमानला अशी पत्नी हवी आहे जी आपल्या मुलांचा डबा बनवेल, त्यांना शाळेत सोडायला जाईल आणि घर सांभाळेल. पण सलमानचं हृदय नेहमी ग्लॅमरस अभिनेत्रींकडे ओढलं जातं.
advertisement
8/10
सलीम खान यांच्या मते, "करिअरसाठी धडपडणाऱ्या अभिनेत्रीने घर सांभाळून मुलांचा अभ्यास घ्यावा, अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. सलमानला त्या मुलीला स्वतःच्या सोयीनुसार कन्व्हर्ट करायचं असतं, जे आजच्या काळात शक्य नाही."
advertisement
9/10
एकदा इंडिया टुडेच्या कार्यक्रमात सलमानने गंमतीने लग्नाबाबत वेगळंच कारण दिलं होतं. तो म्हणाला होता, "आजकाल लग्न ही खूप महागडी गोष्ट झाली आहे. एका लग्नासाठी लाखो-करोडो रुपये खर्च होतात, जे मला परवडणारं नाही. म्हणूनच मी अजूनही सिंगल आहे."
advertisement
10/10
मात्र, त्याच्या चाहत्यांनाही चांगलंच ठाऊक आहे की, पैशांपेक्षाही भावनिक गुंतागुंत हेच त्याच्या अविवाहित राहण्याचं खरं कारण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Salman Khan: 'तो त्याच्या सोयीनुसार मुलींना...' सलीम खान यांनी सांगितलेलं सलमानने लग्न न करण्याचं खरं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल