Bigg Boss फेम आयुष संजीवची गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत; नवरी बनली अभिनेत्री चिन्मयी साळवी, करतेय लग्न?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chinmayee Salvi : अभिनेता आयुष संजीवची गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत आलेली अभिनेत्री चिन्मयी साळवी आता नवरीच्या वेशात दिसली आहे. खरंच ती लग्न करते आहे की आणखी काही...
advertisement
1/7

अभिनेत्री चिन्मयी साळवी म्हणजे 'वागळे की दुनिया' मालिकेतील 'सखी', जिचं नाव आयुष संजीवसोबत जोडलं की आयुषची गर्लफ्रेंड म्हणून ती चर्चेत राहिली, आता आयुष बिग बॉसच्या घरातून बाहेर आला आहे, त्यानंतर चिन्मयी साळवी नवरीच्या वेशात दिसली आहे.
advertisement
2/7
'वागळे की दुनिया' या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली चिन्मयी नुकतीच चर्चेत आली होती ती म्हणजे आयुष संजीवमुळे. बिग बॉसच्या घरात आयुष आणि तन्वीचं रिलेशन पाहिल्यानंतर बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांनी याची बाहेर गर्लफ्रेंड आहे, असं म्हटलं होतं. त्यानंतर आयुषयची ती गर्लफ्रेंड कोण हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक झाले.
advertisement
3/7
त्यावेळी चिन्मयी साळवीचं नाव समोर आलं. कारण आयुष आणि चिन्मयी यांचे बरेच फोटो आहेत. शिवाय आयुषने चिन्मयीच्या बर्थडेला अशी पोस्ट केली होती, ज्यामुळे ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज बांधला गेला.
advertisement
4/7
दरम्यान आता आयुष बिग बॉसच्या घरातून बाहेर आला आणि चिन्मयी नवरीच्या वेशात दिसली आहे. त्यामुळे तिच्या लग्नाची चर्चा होऊ लागली.
advertisement
5/7
पिवळी साडी, डोक्याला बाशिंग, हातात हिरवा चुडा, नाकात नथ... नवरी बनली चिन्मयी साळवी. पण ती रिअल लाइफमध्ये नाही तर रिलमध्ये.
advertisement
6/7
चिन्मयी साळवी झी मराठीवरील नवी मालिका सनई चौघडेमध्ये भूमिका साकारते आहे. ज्यात चार मुलींची आई तिच्या मुलींच्या लग्नाची स्वप्नं पाहत असते. त्यापैकी एक मुलगी चिन्मयी साळवी आहे.
advertisement
7/7
या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता हे कुटुंब एका लग्नात जातं, जिथं चार मुलींच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मेघना एरंडे वधू येताच तिच्यामध्ये चिन्मयीला पाहते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss फेम आयुष संजीवची गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत; नवरी बनली अभिनेत्री चिन्मयी साळवी, करतेय लग्न?