TRENDING:

3 पट पैशांचे आमिष, मित्रानेच घातला 1 कोटी 28 लाखांना गंडा, जालन्यात धक्कादायक प्रकार

Last Updated:

जालन्यात असाच एक प्रकार समोर आला असून मित्रानेच मित्राची तब्बल 1 कोटी 28 लाखांची फसवणूक केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना : फसवणूक असंख्य प्रकार आपल्या आजूबाजूला घडतात. अडला हरि गाढवाचे पाय धरी या उक्तीप्रमाणे अडल्या नडलेल्यांना प्रलोभन देऊन फसवणूक नित्याचीच. जालन्यात असाच एक प्रकार समोर आला असून मित्रानेच मित्राची तब्बल 1 कोटी 28 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
News18
News18
advertisement

2 फेब्रुवारी 2024 रोजी शासकीय गुत्तेदार मंगेश गडवे हे जालना येथील कार्यालयात बसले होते. त्याच वेळी त्यांचा मित्र संदीप भगवान भिंगारे हाही तेथे होता. तुला पैशांची गरज आहे का? असे भिंगारे म्हणाला. त्यावर मंगेश गडवे हो म्हणाले. तुला कमी व्याजदरात पैसे घेऊन देतो परंतु त्यासाठी आपल्याला दिल्लीला जावे लागेल. तेथे 3 लाख मीटिंगसाठी लागतील, त्याची जबाबदारी मी घेतो, असे भिंगारे म्हणाला.

advertisement

लहान मुलांना आवर्जून दाखवा, शिवकालीन लढाऊ जहाजांची माहिती देणारं अनोखं प्रदर्शन; कधी अन् कुठे?

14 फेब्रुवारी 2024 रोजी तीन लाख घेऊन दोघेही दिल्लीला गेले. तेथील एका हॉटेलमध्ये संदीप भिंगारे यांच्या ओळखीचे आदर्श पांडे, अभिनव सिंग आणि सुमित सिंग यांच्यासोबत मीटिंग झाली. त्यावेळी 7 ते 8 जण हजर होते. आमची कंपनी खूप मोठी असून, तुम्ही कंपनीमध्ये गुंतवणूक करा, जेवढी गुंतवणूक कराल, त्याच्या 3 पट रक्कम एका महिन्यात देऊ परंतु तुम्हाला कमीत कमी 50 लाख भरावे लागतील, असे त्यांनी सांगितले. मंगेश गडवे यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी 3 कोटी देण्यास होकार दिला.

advertisement

View More

त्यांनी संदीप भिंगारेच्या माध्यमातून वेळोवेळी रोख रक्कम पाठविली. 10 मार्च 2024 रोजी मंगेश गडवे आणि संदीप भिंगारे हे दोघे 45 लाख रुपये घेऊन लखनौ येथे गेले. तेथे त्यांनी आदर्श पांडे आणि अभिनवसिंग यांच्याकडे सदरील रक्कम दिली. परंतु तेथे आणखी 35 लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

काही दिवसांनंतर त्यांनी संदीपकडे पैशांची मागणी केली परंतु उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. संदीपला तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले परंतु त्याने तूच फसशील, तुझ्यावरच कारवाई होईल, असे सांगितल्याने तक्रार दिली नाही.

advertisement

याप्रकरणी शासकीय कंत्राटदार मंगेश सांडू गडवे (31 रा. मातोश्री कॉलनी, इंदेवाडी, ता.जि. जालना) यांच्या फिर्यादीवरून संशयित संदीप भिंगारे, त्याच्या ओळखीचे आदर्श पांडे, अभिनवसिंग, अन्य एक आणि एक महिला यांच्याविरुद्ध कदीम ठाण्यात 15 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
छंदातून उद्योगाची भरारी, उभारला बैलगाड्यांचा व्यवसाय, वर्षाला 25 लाख उलाढाल
सर्व पहा

मंगेश गडवे यांनी चांगली चौकशी केली असता, त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 15 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी कदीम ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून, सपोनि. सचिन खामगळ हे करीत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
3 पट पैशांचे आमिष, मित्रानेच घातला 1 कोटी 28 लाखांना गंडा, जालन्यात धक्कादायक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल