Chiffon Saree Storage : तुमच्या शिफॉनच्या साड्या वर्षानुवर्षे राहतील फ्रेश आणि सुंदर! फक्त 'हे' 3 हॅक्स करा फॉलो
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How To Store Chiffon Saree For Longer Time : आपल्या शिफॉनच्या साड्या आपल्या खूप आवडीच्या असतात. तशा सर्वच साड्या आपण सांभाळायचा प्रयत्न करत असतो. मात्र शिफॉनच्या साड्यांची आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते. आज आम्ही तुम्हाला या साड्या कशी सांभाळायच्या याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
advertisement
1/7

शिफॉन साड्या खूप सुंदर असतात. मात्र त्या वर्षानुवर्षे तशाच राहून हेदेखील तितकंच अवघड असतं. शिफॉन खूप नाजूक रेशीम आणि नायलॉन धाग्यांपासून बनतं, ज्यामुळे साड्या ताणल्या जाऊ शकतात, फाटतात किंवा जर काळी पडू शकते. बऱ्याच महागड्या साड्यांची चमक काही काळातच कमी होते. आजच्या या खास टिप्स तुमच्या साड्या सुरक्षित ठेवण्यात तुमची मदत करतील.
advertisement
2/7
सर्वात आधी साडी कपाटात ठेवण्यापूर्वी पूर्णपणे स्वच्छ करा. कारण बऱ्याचदा परफ्यूम स्प्रे किंवा अन्नाचे अदृश्य कणदेखील कालांतराने ऑक्सिडाइज होऊन त्याचे साडीवर हट्टी पिवळे डाग पडू शकतात. ज्याला 'फॉक्सिंग' म्हणतात. म्हणून वापरल्यानंतर साडी स्वच्छ कलारूनच कपाटात ठेवा.
advertisement
3/7
तुमची साडी शुद्ध रेशीम शिफॉन असेल, तर ती नेहमी ड्राय-क्लीन करा. कारण हीच सुरक्षित पद्धत आहे. सिंथेटिक शिफॉन घरी हाताने धुता येते, मात्र यातही रंग निघण्याचा किंवा साडीचे तक्श्चर खराब होण्याचा धोका असतो. म्हूणन ड्राय क्लिनिंगचं सर्वोत्तम पर्याय मानला जातो.
advertisement
4/7
शिफॉन साड्यांसाठी सर्वात जास्त घातक गोष्ट म्हणजे घर्षण. तुमच्या साडीत जास्त भरतकाम, सिक्वेन्स किंवा जरीकाम असेल, तर त्या दुमडल्याने साडीच्या इतर भागांना नुकसान होऊ शकते. लक्षात ठेवा, साडीचे धागे गुंतू नयेत आणि कापड सुरक्षित राहावे यासाठी साड्या पॅक करताना विशेष काळजी घ्यावी लागेल.
advertisement
5/7
साड्या घडी घालून ठेवताना घड्यांमध्ये आम्लमुक्त टिशू पेपरच्या ठेवा. या कागदामुळे साड्यांची जर आणि जड काम थेट सुरलक्षित राहाते. यामुळे साडी फाटण्याची शक्यता कमी होते. तसेच साड्या हवेच्या संपर्कात आल्यावरही ऑक्सिडायझेशन होत नाही आणि साड्या काळ्या पडत नाही.
advertisement
6/7
सिल्क शिफॉनमध्ये असलेली प्रथिने सिल्व्हरफिश आणि इतर कीटकांना आकर्षित करू शकते. यामुळे बरेच लोक साड्यांमध्ये नॅप्थालीन बॉल्स ठेवतात. पण त्यांची रसायने साड्यांचा रंग फिका करू शकतात. म्हणून वॉर्डरोबच्या कोपऱ्यात देवदार लाकडाचे तुकडे किंवा वाळलेल्या कडुलिंबाच्या पानांचे छोटे गठ्ठे ठेवा. यामुळे किटकॅक दूर राहतील आणि साड्यांचा रंगही.
advertisement
7/7
शिफॉनच्या साड्या सुरक्षित ठेवण्यासाठी वाळलेल्या संत्र्याच्या सालीदेखील तुम्ही कपाटात ठेऊ शकता. यामुळेही कीटक दूर राहतात आणि तुमच्या साड्यांना हलका फ्रेश सुगंधही येईल. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chiffon Saree Storage : तुमच्या शिफॉनच्या साड्या वर्षानुवर्षे राहतील फ्रेश आणि सुंदर! फक्त 'हे' 3 हॅक्स करा फॉलो