Chicken Mutton Masala : चिकन मसाला आणि मटण मसाल्यात नॉनव्हेज असतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chicken Mutton Masala : चिकन मसाला आणि मटण मसाला म्हटलं की यामध्ये नॉनव्हेज असतं का? असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडतो. तज्ज्ञांनी याचं उत्तर दिलं आहे.
advertisement
1/7

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले मिळतात. पनीर टिक्का मसाला, बिर्याणी मसाला, पावभाजी मसाला, चिकन मसाला आणि मटण मसाला. आता चिकन मसाला आणि मटण मसाला म्हटलं की यामध्ये नॉनव्हेज असतं का? असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडतो.
advertisement
2/7
चिकन आणि मटण मसाला याचं नाव आणि त्याच्या पाकिटावर असलेला नॉनव्हेजचा फोटो. त्यामुळे या मसाल्यात थोडे नॉनव्हेज घटक असावेत असं अनेकांना वाटतं. (AI Generated Image)
advertisement
3/7
मांसाहार खाणारे बहुतेक लोक काही शाकाहारी पदार्थांमध्ये चवीसाठी या मसाल्याचा वापर करतात. पण शाकाहारी लोक मात्र यामध्ये नॉनव्हेज म्हणून हे मसाले घेणं टाळतात. (AI Generated Image)
advertisement
4/7
पण अन्न विज्ञान तज्ज्ञ आणि दिगा ऑरगॅनिक्सचे संस्थापक आलोक सिंग यांनी चिकन आणि मांस मसाला पूर्णपणे वनस्पती-आधारित असल्याचं सांगितलं आहे. (AI Generated Image)
advertisement
5/7
चिकन मसाला किंवा मांस मसालासारखे मसाले मिश्रण सामान्यतः पूर्णपणे शाकाहारी घटक जसं की खडे मसाले, औषधी वनस्पती आणि कधीकधी वाळलेला कांदा किंवा लसूण पावडर वापरून बनवले जातात, असं त्यांनी सांगितलं. (AI Generated Image)
advertisement
6/7
चिकन मसाला, मटण मसाला किंवा अगदी फिश करी मसाला असे लेबल असले तरी ते शाकाहारी घटक वापरून तयार केले जातात. मसाल्यांचं नाव पदार्थाचा संदर्भ देतात मसाल्याच्या मिश्रणातील सामग्रीचा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. (AI Generated Image)
advertisement
7/7
मांसाहारासाठी असलेले हे मसाले हा शाकाहारी पदार्थांची चव वाढवू शकतात. उदाहरणार्थ, चिकन मसाल्यामध्ये बहुतेकदा उबदार, मातीचे मसाले असतात जे मशरूम, फणस किंवा अगदी पनीरसारख्या भाजीची चव वाढवता.. मटण मसाला मसूर, सोया चंक्स किंवा मिश्र भाज्यांच्या ग्रेव्हीची चव वाढवू शकतात. थोड्याशा सर्जनशीलतेसह हे मसाले शाकाहारी आणि मांसाहारी कुटुंबांसाठी सहजपणे पॅन्ट्रीचे मुख्य पदार्थ बनू शकतात, असं तज्ज्ञ सांगतात. (AI Generated Image)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chicken Mutton Masala : चिकन मसाला आणि मटण मसाल्यात नॉनव्हेज असतं?