Tips and Tricks : पाण्याच्या बॉटलमधून वास येतोय? 'ही' युक्ती वापरा, बॉटल होईल अगदी स्वच्छ..
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Water bottle cleaning tips : दररोज पाण्याच्या बाटलीत पाणी ठेवल्याने काही दिवसांनी त्याचा वास येऊ शकतो. ताक, दूध किंवा इतर वस्तू साठवल्यानेही दुर्गंधी येऊ शकते. अशावेळी बॉटलमधून दुर्गंधी येऊ लागते आणि त्यातील पाणी प्यावेसे वाटत नाही. आज आपण बॉटल स्वच्छ कारण्यासाटःई काही टिप्स पाहणार आहोत, ज्याने हा वास पूर्णपणे नाहीसा होईल.
advertisement
1/5

काहीवेळा दीर्घकाळ पाणी साठवळ्यामुळे बॉटलमधून वास येऊ लागतो. म्हणूनच बॉटलच्या नियमित स्वच्छतेकडे अतिरिक्त लक्ष देणे आवश्यक आहे. थोडासाही निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. चला पाहूया बॉटलची स्वच्छता कशी राखायची...
advertisement
2/5
या युक्तीने वास दूर करा : पाण्याच्या बाटल्यांमधील वास दूर करण्यासाठी पूर्णिया येथील कुशल गृहिणी गुडिया कुमारी यांनी काही उपाय सांगितले आहेत. सर्वप्रथम बाटली पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर त्यात डिटर्जंट पावडर, डिशवॉशिंग लिक्विड किंवा डिश साबणाचे तुकडे घाला आणि गरम पाणीही टाका. ते 15 मिनिटे तसेच राहू द्या.
advertisement
3/5
नंतर बाटलीच्या आतील बाजू पातळ कापडाने स्वच्छ करण्यासाठी कॉटनचे कापड किंवा कागदी टॉवेल वापरा आणि बॉटल व्यवस्थित हलवून स्वच्छ करा. थोड्या वेळाने बाटली स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे लगेच फरक दिसेल.
advertisement
4/5
मानवी जीवनात पाणी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. माणूस अन्नाशिवाय जगू शकतो, पण पाण्याशिवाय नाही. पावसाळ्यात स्वच्छता राखणे विशेषतः महत्वाचे आहे. कारण या काळात आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. शाळेपासून कॉलेज, ऑफिसपर्यंत सर्वजण पाण्याच्या बाटल्या वापरतात. म्हणून त्या स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
advertisement
5/5
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips and Tricks : पाण्याच्या बॉटलमधून वास येतोय? 'ही' युक्ती वापरा, बॉटल होईल अगदी स्वच्छ..