Geyser- Heater Buying Tips: हिवाळ्यात पाणी गरम करण्यासाठी गिझर की हिटर रॉड? चांगला पर्याय कोणता?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Gyeser- Heater Rod Buying Tips In Marathi: पाणी गरम करण्यासाठी काय घ्यावं, गिझर योग्य की हिटर रॉड? असा प्रश्न देखील अनेकदा आपल्याला पडतो. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी योग्य माहिती असणे गरजेचे आहे.
advertisement
1/6

हिवाळा सुरु झाला की थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी आपली खरेदी सुरु होते. मग गिझर ते हिटर रॉड पासून ते अगदी गरम कपड्यांपर्यंत आपण सर्व काही घेतो. पण, पाणी गरम करण्यासाठी काय घ्यावं, गिझर योग्य की हिटर रॉड? असा प्रश्न देखील अनेकदा आपल्याला पडतो. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी योग्य माहिती असणे गरजेचे आहे.
advertisement
2/6
तुम्हाला गिझर किंवा हिटर खरेदी करण्यापूर्वी कोणत्या प्रकारच्या हिटर रॉड, गिझरची खरेदी करावी जेणेकरून धोक्याचे संकेतापासून संरक्षण होईल. त्यात सामान्य माणसं मोठ्याप्रमाणात हिटर रॉड खरेदी करतात.
advertisement
3/6
परंतु गिझर किंवा हिटर खरेदी करत असताना ज्यामध्ये गीझर (जॉइंट-टँक वॉटर हीटर) आणि इम्मेरसन रॉड (इमर्शन वॉटर हीटर) यांसारखे प्रकार येतात. त्यातच वॉटरप्रूफ हिटर यावर्षी बाजारात उपलब्ध झाले आहे. जे वापरल्याने शॉक लागण्याचा चान्स 99% नाहीत. त्यामुळे हे वॉटरप्रूफ हिटर खरेदी करणे फायदेशीर ठरेल.
advertisement
4/6
हिटर रॉडची किंमत 300 ते 1 हजार रुपयांपर्यंत आहे. हिटर रॉड साधारणपणे 1.5 ते 2 किलोवॅट विजेचा वापरतो. यात प्रति तास दीड युनिट वीज वापरली जाते. हिटर रॉड तुम्ही कुठेही बॅगेत घालून घेऊन जाऊ शकतात आणि वजनाला हलके सुद्धा आहे. हा हिटर रॉड एक बादली पाणी 10- 15 मिनिटांत गरम करते. लहान कुटुंबं किंवा प्रवासासाठी उपयुक्त आहे.
advertisement
5/6
अडीच हजार ते 15 हजारापर्यंत गिझरची किंमत जास्त असली तरी ती दीर्घकालीन गुंतवणूक आहे. इन्स्टंट गिझरमध्ये 3 ते 5 किलोवॅट विजेचा वापर होतो. तर स्टोरेज गिझरमध्ये 2 ते 3 किलोवॅट वीज लागते. त्यात रॉडपेक्षा जास्त वीज खर्च होते. बटण दाबताच पाणी गरम होते. इन्स्टंट गिझर लहान कुटुंबांसाठी उपयुक्त आहे तर, स्टोरेज गिझर मोठ्या कुटुंबांसाठी उपयुक्त आहे.
advertisement
6/6
गिझरमध्ये टेंपरेचर कंट्रोल, पॉवर इंडिकेटर आणि पीयूएफ इन्सुलेशन सारखे अनेक फीचर्स मिळतात. पाणी तापवण्यासाठी हा एक महागडा पर्याय आहे. त्याचा वापर करण्यासाठी अधिक जागेची आवश्यकता असते. बजेट कमी असेल तर हिटर रॉड चांगला असतो. दीर्घ काळासाठी जर आपल्याला दीर्घकालीन वापराची आवश्यकता असेल तर गीझर हा एक चांगला पर्याय आहे. विजेची बचत करण्यासाठी हिटर रॉड चांगला आहे. मोठ्या प्रमाणात पाणी तापवण्यासाठी गिझर उपयुक्त आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Geyser- Heater Buying Tips: हिवाळ्यात पाणी गरम करण्यासाठी गिझर की हिटर रॉड? चांगला पर्याय कोणता?