सावधान! तारांमध्ये मांजा अडकला तर तुटेल तुमच्या आयुष्याचा दोरा; मृत्यूचा धोका, पण कसा?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Makar Sankranti Kite Flying : मकर संक्रांतीला पतंग उडवताना काळजी घ्या. विजेच्या तारेत, खांबात मांजा अडकला तर खेचू नका, पतंग अडकली तर ती काढण्याचा प्रयत्न करू नका.
advertisement
1/7

मकर संक्रांत जवळ आली आहे आणि संक्रांत म्हटलं की पतंगबाजी आलीच. पतंग उडवताना बर्‍याचदा पतंगीचा मांजा विजेच्या तारेत, खांबाला अडकलेला तुम्ही पाहिला असेल. पण यामुळे तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो.
advertisement
2/7
मांजा हा धातूपासून बनवलेला आहे, तो कोणत्या धातूपासून बनवला आहे याची माहिती नसते.धातू मिश्रित मांजा विद्युत यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यात विद्युत प्रवाहित होऊन विजेचा शॉक लागू शकतो.
advertisement
3/7
वीज वितरणासाठी तारांचे जाळे पसरलेले आहेत. यात लघू, उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहाच्या वाहिन्या असतात. पतंग उत्सवाच्या काळात तारांवर मांजाचे जाळेच तयार होते.
advertisement
4/7
त्यामुळे बहुतांश वेळा वीज पुरवठा खंडित होतो. विद्युत तारांमध्ये मांजा अडकून शॉक लागण्याचा आणि शॉकसर्किट होण्याचा धोका मोठा आहे. मांजामुळे शॉकसर्किटचा धोका होण्याचे प्रमाण जानेवारी महिन्यात वाढते.
advertisement
5/7
धातू मिश्रित मांजा विद्युत तारांमध्ये अडकून वीजपुरवठा विस्कळीत होऊन ताराला तारा चिटकल्या तर हाय होल्टेज वाढू शकते आणि मोठे नुकसान होऊ शकते. जीवितास धोकाही निर्माण होऊ शकतो.
advertisement
6/7
विद्युत वाहिन्या, खांबावर, रोहित्रांजवळ अडकलेले पतंग, मांजा काढण्याचा प्रयत्न टाळावा. विद्युत वाहिन्यांत अडकलेले पतंग काढण्यासाठी दगडाला मांजा, दोरा बांधून वाहिन्यांवर फेकणं चुकीचं आहे.
advertisement
7/7
धातूमिश्रित मांजाचा वापर टाळावा. कारण धातूमिश्रित मांजा विद्युत यंत्रणेच्या संपर्कात आला तर विजेचा धक्का लागण्याची दाट शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
सावधान! तारांमध्ये मांजा अडकला तर तुटेल तुमच्या आयुष्याचा दोरा; मृत्यूचा धोका, पण कसा?