TRENDING:

Knowledge : कोब्रा सापाची मादी एका वर्षात किती पिल्लांना जन्म देते? किती पिलं जगतात?

Last Updated:
कोब्रा सापाची मादी एका वर्षात किती अंडी घालते आणि किती पिल्लं जन्माला येतात, हे निश्चितपणे सांगता येत नाही. कारण ही संख्या स्थळ आणि वेळेनुसार बदलते. सापांबाबत भारतासह जगभरात अनेक कथा आणि दंतकथा प्रचलित आहेत. त्या अनुषंगाने याविषयी काही माहिती घेऊ या.
advertisement
1/7
कोब्रा सापाची मादी एका वर्षात किती पिल्लांना जन्म देते? किती पिलं जगतात?
1. किंग कोब्रा अतिशय आकर्षक असतो. हे कोब्रा प्रामुख्याने आशियामध्ये आढळतात; पण सापांचा जन्म कसा होतो? ते केवळ ठरावीक संख्येने अंडी घालण्यास सक्षम आहेत का? त्यांची सर्व अंडी उबतात का आणि त्यापैकी किती जगतात? कोब्रा मादीला आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या. यामुळे अनेक गैरसमज दूर होतील.
advertisement
2/7
2. पूर्ण प्रौढ किंग कोब्रा पिवळा, हिरवा, तपकिरी आणि काळ्या रंगाचा असतो. त्यांच्या शरीरावर पिवळे किंवा पांढरे आडवे जाड पट्टे असतात. त्यांच्या गळ्याच्या भागात फिकट पिवळा किंवा क्रीम कलर असतो. त्यांची पिल्लं पूर्णपणे काळ्या रंगाची असतात आणि संपूर्ण शरीरावर पिवळे किंवा पांढरे पट्टे असतात. भारतात मोठ्या प्रमाणात आढळणारा हा साप अत्यंत विषारी मानला जातो. तसंच तो जितक्यांदा चावतो, त्या प्रत्येक वेळी त्या चाव्यात विष असेलच असं नाही.
advertisement
3/7
3. किंग कोब्रा प्रामुख्याने आग्नेय आशिया आणि भारतात आढळतात. ते मांसाहारी साप म्हणून ओळखले जातात. ते प्राण्यांव्यतिरिक्त अजगर किंवा इतर सापदेखील खातात. ते पक्षी, सरडे आणि उंदीरही खातात. ते भरपूर उंदीर आणि इतर जमिनीवरील कीटक खातात. म्हणून हे साप शेतात फिरत असतील तर चांगली गोष्ट मानली जाते. कारण ते पिकांची नासाडी करणारे प्राणी खातात.
advertisement
4/7
4. कोब्रा साप खूप शक्तिशाली असतात. ते केवळ त्यांच्या शेपटीच्या आधारावर त्यांच्या शरीराचं वजन उचलू शकतात. त्यांची लांबी 3 ते 5 मीटरपर्यंत असते. कधी कधी ती सहा मीटरपर्यंत असते. कोब्रा प्रजातीचे साप जगातले सर्वांत लांब साप मानले जातात.
advertisement
5/7
5. किंग कोब्राची मादी 50 ते 59 दिवस गरोदर असते. ही सापांची अशी एकमेव प्रजात आहे, जी आपल्या अंड्यांसाठी घरटं बनवतं. बहुतांश घरटी झाडांच्या खोडाच्या पायथ्याशी बांधली जातात. एका वेळी घरट्यात 7 ते 43 अंडी असू शकतात. त्यापैकी 6 ते 38 अंड्यांतून 66 ते 105 दिवसांनंतर पिल्लं जन्माला येतात. कोब्रा मादी पिल्लांचा जन्म होईपर्यंत अंड्यांचं स्वतः संरक्षण करते.
advertisement
6/7
6. किंग कोब्राचा प्रजनन काळ जानेवारी ते एप्रिलदरम्यान असतो. मादी कोब्रा एका वेळी 21 ते 40 अंडी घालते. वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात अंड्यांचं ती संरक्षण करते. पावसाळ्यात ही पिल्लं अंड्यांतून बाहेर येतात. साधारणपणे असं दिसून आलंय, की साप संवर्धन केंद्रांमध्ये असं दिसून आलं आहे, की पिल्लांची संख्या अंड्यांच्या संख्येच्या तुलनेत पाच टक्क्यांपर्यंत कमी असते. म्हणजेच फक्त दोन ते 35 अंड्यांतून पिल्लं बाहेर येतात. हे प्रमाण अनेक घटकांवर अवलंबून असतं.
advertisement
7/7
7. अंड्यांतून बाहेर पडलेल्या पिल्लांची लांबी 20 ते 30 सेंमी असते. त्यांचा रंग सात दिवस पांढरा राहतो. नंतर तो काळा होतो आणि त्यांना दात येतात. परंतु वयानुसार त्यांचा रंग फिकट होऊ लागतो. 21 दिवसांत त्यांच्यात विष तयार होऊ लागतं आणि हे विष मोठ्या सापांइतकंच प्रभावी असतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Knowledge : कोब्रा सापाची मादी एका वर्षात किती पिल्लांना जन्म देते? किती पिलं जगतात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल