लांब की गोल, कोणतं वांगं शरीरासाठी धोकादायक? या गोष्टीचा तुम्ही कधी विचारही केला नसेल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Eggplant Health Benefits : वांगी आरोग्यदायी भाजी असून लांब व गोल असे दोन प्रकार आहेत. पण आपल्या आरोग्यासाठी कोणती वांगी हानिकारक ठरू शकतात, हे तुम्हाला माहित आहे का?
advertisement
1/7

बाजारात सहज मिळणारी, घराघरात बनणारी आणि अनेक पदार्थांची चव वाढवणारी एक खास भाजी म्हणजे वांगी! काही लोकांच्या फेवरीट तर काहींच्या नाव ऐकूनच नाकं मुरडणाऱ्या या भाजीत आरोग्यदायी गुण मात्र भरपूर आहेत.
advertisement
2/7
मात्र, तुम्हाला माहिती आहे का की वांग्याचेही दोन मुख्य प्रकार आहेत, लांबट आणि गोल? या दोघांमध्ये चव, पोषणमूल्य आणि पचण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे फरक असतात, जे कधीकधी तुमच्या आरोग्यावरही परिणाम करू शकतात.
advertisement
3/7
लांब वांगी ही नेहमीच्या भाजीसाठी, पराठा किंवा हलक्या करीसाठी खूपच उपयुक्त असतात. ती लवकर शिजतात, त्यात बिया कमी असतात आणि चवीलाही सौम्य व गोडसर असतात. विशेषतः लहान आणि ताजी लांब वांगी हलकी असतात. त्यामुळे रोजच्या आहारात यांचा वापर केल्यास पचन सुधारते.
advertisement
4/7
दुसरीकडे, गोल वांगी ही भरली वांगी, भरीत किंवा थोडं गडद मसाल्याच्या भाज्यांसाठी वापरली जातात. मात्र, ही वांगी थोडी कडवट होण्याची शक्यता अधिक असते, विशेषतः जुनी किंवा मोठी वांगी. त्यात बऱ्याचदा भरपूर बिया असतात, जे काही लोकांना त्रासदायक वाटू शकतात.
advertisement
5/7
आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर वांग्यामध्ये हृदयासाठी फायदेशीर अँटीऑक्सिडंट्स असतात. ते डायबेटीसवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात, वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडतात आणि हाडं मजबूत करतात. एवढंच नाही तर वांग्यामध्ये असलेले पोषकतत्त्व मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त ठरतात, त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर असतात. पण, कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर चांगली नसते, तसंच वांगीही.
advertisement
6/7
काही लोकांना यामुळं गॅस, अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. विशेषतः गरोदर महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचा आहारात समावेश करावा. आणि लक्षात ठेवा, कच्चं वांगं खाणं टाळावं, कारण त्यात असलेले सोलनिन हे दुष्परिणाम घडवू शकतं.
advertisement
7/7
म्हणूनच, तुम्ही रोजच्या जेवणासाठी पोषक आणि हलकी भाजी शोधत असाल, तर लांब वांगी हा उत्तम पर्याय आहे. पण खास सणासुदीला, एखादी झणझणीत भरली वांगी हवी असेल तर गोल वांग्यालाही थोडीशी संधी द्यायलाच हवी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
लांब की गोल, कोणतं वांगं शरीरासाठी धोकादायक? या गोष्टीचा तुम्ही कधी विचारही केला नसेल