TRENDING:

Haldi Kunku Ukhane : हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी स्पेशल उखाणे, 'या' उखाण्यांनी आणखी खास होईल सोहळा!

Last Updated:
Sankranti Haldi Kunku Special Ukhane In Marathi : मकर संक्रांतीच्या दिवसानंतर महिला एकत्र मिळून किंवा प्रत्येकीच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. यामध्ये त्या वाण लूटतात. त्यात नवीन लग्न झालेल्या महिलांसह सर्वच महिलांसाठी हा हळदीकूंकू खूप महत्त्वाचा सोहळा असतो. मग अशात उखाणा घेण्याचा कार्यक्रमही होतोच. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही अगदी भन्नाट हळदी कुंकू स्पेशल उखाणे घेऊन आलो आहोत.
advertisement
1/9
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी स्पेशल उखाणे, 'या' उखाण्यांनी आणखी खास होईल सोहळा
जीवन म्हणजे, सुख दुःखाच्या खेळी ….. रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी..
advertisement
2/9
कपाळीचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा …... रावांचे नाव घेते हळदी कुंकवाला बसा..
advertisement
3/9
हळदी कुंकवाला आल्या, साऱ्या महिला नटून …... रावांनी आणलेली साडी दिसते कशी उठून..
advertisement
4/9
संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान …... रावांच्या जीवावर देते हळदी कुंकवाचं वाण..
advertisement
5/9
मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी …... रावांचं नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी..
advertisement
6/9
गळ्यात मंगळसूत्र, ही पतिव्रतेची खून …... रावांचं नाव घेते …... ची सून..
advertisement
7/9
हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका …... रावांचं नाव घेते, सर्वांनी ऐका..
advertisement
8/9
चांदीच्या ताटात रेशमी खण …... रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचा आहे सण..
advertisement
9/9
सर्वजणी एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस आहे खास …... रावांचं नाव घेण्याची लागली मला आस..
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Haldi Kunku Ukhane : हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी स्पेशल उखाणे, 'या' उखाण्यांनी आणखी खास होईल सोहळा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल