Women's Day 2024: तिला रत्नजडित हार नको, 'ती' एकच गोष्टी द्या आणि तिचा आनंद पाहा!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Women's Day Gift Ideas 2024: दरवर्षी 8 मार्चला आंतराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. यंदा या दिवशी आपल्याला आपल्या आईला, बहिणीला, प्रेयसीला किंवा मैत्रिणीला स्पेशल फील करवून द्यायचं असेल, तर त्यांना एक खास गिफ्ट द्या. खरंतर स्त्रिया इतक्या भावूक असतात की, तुम्ही त्यांना काय देताय यापेक्षा काहीतरी गिफ्ट देताय या विचारानेच त्या प्रचंड आनंदी होतील. (आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी)
advertisement
1/5

स्त्री गृहिणी असो किंवा नोकरी करणारी असो, तिला घर सांभाळावं लागतंच. तिला हक्काची अशी एकही सुट्टी नसते. त्यामुळे येत्या महिला दिनी तिला तिच्या हक्काचा वेळ द्या. एक दिवस तिच्याऐवजी तुम्ही घर सांभाळा. हवं तर तिला तिच्या आवडीचे पदार्थही बनवून खाऊ घाला. त्यानंतर पाहा तिच्या ओठांवर हसू आणि डोळ्यांत आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाही.
advertisement
2/5
आजकाल प्रत्येकाच्या मनगटावर घड्याळ असतं. परंतु तिला वेळ पाहता यावी म्हणून नाही, तर तिला तिच्या स्वतःसाठीसुद्धा वेळ काढायचाय, याची वेळोवेळी आठवण राहावी यासाठी महिला दिनी घड्याळ गिफ्ट द्या.
advertisement
3/5
अगदी शालेय मुलींपासून वृद्ध महिलेपर्यंत दागिने हा स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे यंदाच्या महिला दिनी तुम्ही तिला तिच्या आवडीचा एखादा नेकलेस, कानातले किंवा अंगठी गिफ्ट करू शकता.
advertisement
4/5
सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात फिटनेत सर्वात उपयोगी आहे. त्यामुळे तिने तिच्या फिटनेसची काळजी घ्यावी यासाठी तिला एक फिटनेस बँड द्या. ज्यामुळे दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीमधून हे बँड तिच्या फिटनेसची नोंद ठेवेल.
advertisement
5/5
ती सर्वांसाठी खूप मेहनत करते, पण बचत व्हावी म्हणून स्वतःसाठी मात्र काहीच करत नाही. त्यामुळे या महिला दिनी तिला एक ब्रँडेड बॅग गिफ्ट करा, जी वर्षानुवर्षे टिकेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Women's Day 2024: तिला रत्नजडित हार नको, 'ती' एकच गोष्टी द्या आणि तिचा आनंद पाहा!