TRENDING:

Mauni Amavasya : मौनी अमावस्येचं मौन व्रत फक्त धार्मिक नाही; विज्ञानातही सांगितलेत चमत्कारिक फायदे

Last Updated:
Mauni Amavasya Silence Health Benefits : मौनी अमावस्या हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्त्वपूर्ण दिवस आहे ज्याचा सर्वोत्तम उपयोग मौन, आत्मनिरीक्षण, ध्यानीकरण आणि साधनेच्या प्रक्रियेसाठी केला जातो. धार्मिक दृष्टिकोनानुसार मौन ठेवणे मन आणि आत्म्याला शुध्दी देण्याचे साधन आहे, पण वैज्ञानिका दृष्टिकोनातूनही याचं खूप महत्त्व आहे.
advertisement
1/5
मौनी अमावस्येचं मौनव्रत फक्त धार्मिक नाही; विज्ञानातही सांगितलेत चमत्कारिक फायदे
एरवी अमावास्या म्हणजे वाईट मानली जाते. पण मौनी अमावस्या खास आहे. यादिवशी मौन व्रत केलं जातं. मौनी अमावस्येच्या मौन व्रताचं फक्त धार्मिक महत्त्वच नाही तर त्याचे असे चमत्कारिक फायदे आहेत जे विज्ञानातही सांगितले आहेत.
advertisement
2/5
मौन व्रत म्हणजे शांत राहणे, काहीच न बोलणे... याच्या फायद्यांबाबत काही अभ्यास करण्यात आले आहेत, जे वेगवेगळ्या रिसर्च पेपरमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
advertisement
3/5
मध्ये प्रसिद्ध केलेला प्रोग्रेस इन ब्रेन रिसर्च 2023 अंतर्गत सायलेन्स अँड इट्स इफेक्ट्स ऑन द ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टम हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात मौन शरीराच्या ऑटोनोमिक नर्वस सिस्टीमवर सकारात्मक प्रभाव करते, विश्रांती क्रिया वाढवून आणि तणाव प्रतिक्रिया कमी करून मानसिक शांतता आणि तणाव कमी करतो.
advertisement
4/5
मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार  शांत वातावरण मेंदूला आतल्या विचारांकडे वळवून एकाग्रता वाढवते आणि कार्यक्षम निर्णय घेण्यास मदत करतं.
advertisement
5/5
मौन किंवा ध्यान साधना यामुळे नर्व्हस आणि हिप्पोकॅम्पस हा मेंदूतील स्मृती साठवण्याचा आणि शिकण्याचा भाग यावर परिणाम करतो. यामुळे स्मरण, चिंता नियंत्रण आणि आत्मनियंत्रण वाढतं.  ध्यान आणि शांतता मनोवैज्ञानिक आरोग्यावर परिणाम करतं. ज्यामुळे चिंता कमी होते, भावनात्मक व्यवस्थापन सुधारते आणि समग्र मानसिक तंदुरुस्ती वाढते, असं च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mauni Amavasya : मौनी अमावस्येचं मौन व्रत फक्त धार्मिक नाही; विज्ञानातही सांगितलेत चमत्कारिक फायदे
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल