जसजशी वाढते गुलाबी थंडी, तसतशी मिळते 'या' मिठाईला पसंती
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
गुलाबी थंडी जसजशी पडू लागलीये तसतशी बाजारात विविध खाद्यपदार्थांची चंगळ पाहायला मिळतेय. तीळ, गूळ, खवा, इत्यादींपासून बनवलेल्या पदार्थांना या काळात विशेष मागणी असते. शिवाय गजक नामक मिठाईही थंडीत लोक आवडीने खातात.
advertisement
1/5

उत्तर प्रदेशच्या मेरठ भागात लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत अनेकजणांना गजक मिठाई प्रचंड आवडते. हिवाळ्यात तर मेरठहून गजक संपूर्ण देशभरात पोहोचवली जाते. या मिठाईला दूरदूरहून मागणी मिळते.
advertisement
2/5
मेरठचे रहिवासी रामचंद्र सहाय यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात तिळापासून बनवलेली स्वादिष्ट गजक मिठाई विकण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत ही मिठाई इथल्या नागरिकांची पहिली पसंत आहे. दिल्लीहून आलेल्या पर्यटकांना ती विशेष आवडते.
advertisement
3/5
महत्त्वाचं म्हणजे इथे गजक मिठाई विविध फ्लेव्हरमध्ये मिळते. त्यामुळे चॉकलेट फ्लेव्हरची गजक लहान मुलं आवडीने खातात आणि पूर्ण खव्यापासून बनवलेली मऊ गजक मिठाई खाणं वृद्धी व्यक्ती पसंत करतात.
advertisement
4/5
आज रामचंद्र सहाय यांच्या दुकानात गजक मिठाई बनवण्यासाठी 14 कामगार कार्यरत आहेत. गूळ, साखर आणि शेंगदाण्यापासून ती बनवली जाते. त्यामुळे तिची चव अतिशय स्वादिष्ट असते.
advertisement
5/5
मेरठच्या बुढाना गेट बाजारात गरज मिठाईची अनेक दुकाने पाहायला मिळतात. जिथे एक नाही, दोन नाही, तर 55 प्रकारची गजक मिठाई खायला मिळते. शिवाय इथल्या गजक रोल आणि तिळाच्या लाडूंनाही विशेष मागणी असते.