TRENDING:

मिसाइल हल्ले, परदेशात अडलेला मुलगा अन् 10 दिवसांचा थरार! लेक सुखरुप भारतात येताच अभिनेत्रीने गाठले शिंदेंचं निवासस्थान

Last Updated:
Vishakha Subhedar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल १० दिवस कुवेतमध्ये अडकलेल्या विशाखा सुभेदारच्या मुलाला सुखरुप भारतात परत आणलं.
advertisement
1/9
लेक सुखरुप भारतात येताच अभिनेत्रीने गाठले शिंदेंचं निवासस्थान
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिका-इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धावर असून यामुळे झळ सर्वच देशांना बसत आहेत. अशातच वेगवेगळ्या देशांमधील पर्यटक या युद्धामुळे बाधित झालेल्या भागात अडकल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
advertisement
2/9
मराठमोळी अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगाही याच युद्धामुळे कुवेतमध्ये अडकला होता. आपल्या मुलाला सुखरुप पाहण्यासाठी या आईचा जीव कासाविस झाला होता. यामुळे तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या मुलाला भारतात सुखरुप परत आणावे यासाठी सरकारला आवाहन केले होते.
advertisement
3/9
विशाखाच्या या विनवणीची तात्काळ दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि तब्बल १० दिवस कुवेतमध्ये अडकलेल्या विशाखा सुभेदारच्या मुलाला सुखरुप भारतात परत आणलं. अशातच आज अभिनय आणि विशाखा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
advertisement
4/9
विशाखा सुभेदारचा मुलगा अभिनय कुवेत मार्गे लंडनला निघाला होता. तो कुवेतमध्ये ट्रान्झिटसाठी थांबला असतानाच इराणने कुवेतवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू केले. अवघ्या काही मिनिटांत कुवेतचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आणि उड्डाणे रद्द झाली.
advertisement
5/9
बाहेर युद्धजन्य परिस्थिती आणि परदेशात अडकलेल्या मुलाच्या सुरक्षेसाठी विशाखा कासाविस झाली होती. विशाखा सुभेदारने जेव्हा सोशल मीडियावर मदतीसाठी टाहो फोडला, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र तिला पाहून हळहळत होता.
advertisement
6/9
विशाखा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साकडं घातलं. मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. कुवेतमध्ये अडकलेल्या अभिनयला भारतात आणण्यासाठी सौदी अरेबियाचा व्हिसा आवश्यक होता.
advertisement
7/9
त्याला व्हिसा मिळत नसल्याने विशाखाचा जीव टांगणीला लागला होता. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी असीम महाजन यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि त्याला सौदीचा व्हिसा मिळवून दिला. त्यानंतर कुवेतहून अभिनयसह ३० महाराष्ट्रीय नागरिकांनी रस्ते मार्गाने तब्बल १० तास प्रवास करून सौदीतील रियाध गाठलं. तिथून मग मुंबईचं विमान पकडलं.
advertisement
8/9
मुलाच्या सुरक्षेसाठी चिंतेत असणाऱ्या विशाखाने जेव्हा तब्बल १० दिवसांनी आपल्या मुलाला मुंबई विमानतळावर पाहिलं, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले होते. तिने अभिनयला घट्ट मिठी मारली. ती म्हणाली होती, "कुवेतमधून बाहेर पडणं अशक्य वाटत होतं, पण सरकारने हलवलेल्या सूत्रांमुळेच आज माझा मुलगा माझ्यासमोर आहे."
advertisement
9/9
मुलाला सुरक्षित भारतात आणण्याची व्यवस्था केल्याबद्दल विशाखा आणि अभिनय यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थळी जाऊन त्यांचे आभार मानले. यावेळी शिंदे म्हणाले, "आम्ही केवळ आमचं कर्तव्य पार पाडलं आहे. संकटात सापडलेल्या मराठी माणसाला सुरक्षित घरी आणणं ही आमची जबाबदारीच आहे." यावेळी शिवसेना सचिव सुशांत शेलार देखील उपस्थित होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मिसाइल हल्ले, परदेशात अडलेला मुलगा अन् 10 दिवसांचा थरार! लेक सुखरुप भारतात येताच अभिनेत्रीने गाठले शिंदेंचं निवासस्थान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल