TRENDING:

Milk Expiry Date Importance : रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेले पॅकेटचे दूध एक्सपायरी डेटनंतर वापरणं योग्य आहे का?

Last Updated:
Is it okay to drink milk after expiry date : बऱ्याचदा घरात आणलेले दूध काही कारणास्तव लवकर वापरले जात नाही. त्यानंतर त्याची एक्स्पायरी डेट निघून जाते आणि अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की, हे एक्स्पायरी डेट निघून गेलेले दूध वापरावे की नाही. काही लोकांना वाटते दूधच आहे, जोवर ते फाटत नाही तोवर ते चांगलेच असते. मात्र काही लोकांना से दूध पिण्याची भीती वाटते. आज पण याबद्दल सविस्तर माहिती पाहत आहोत.
advertisement
1/7
रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेले पॅकेटचे दूध एक्सपायरी डेटनंतर वापरणं योग्य आहे का?
पॅकेज केलेल्या दुधाचा विचार केला तर अमूल, मदर डेअरी, सुधा डेअरी किंवा इतर दुग्धशाळेच्या पॅकेज केलेल्या दुधावर एक्स्पायरी डेट छापलेली असते. कधीकधी, योग्यवेळी वापर ना झाल्याने दुधाची एक्स्पायरी डेट ओलांडली जाते. अशावेळी वाटते, एक्स्पायरी डेटनंतरचे दूध प्यावे का? किंवा, जर दूध गरम केल्यावर फाटत नसेल, तर ते हानिकारक असेल का? किंवा एक्स्पायर झालेले दूध फेकून द्यावे किंवा कुत्र्याला किंवा मांजरीला प्यायला द्यावे?
advertisement
2/7
तज्ज्ञांच्या मते, एक्स्पायरी डेटनंतर एक-दोन दिवसांनीही अन्नपदार्थ सेवन केल्याने कोणतेही नुकसान होऊ शकत नाही. त्याच वेळी, हे देखील शक्य आहे की एखाद्याला एक्स्पायरी डेटनंतरचे काहीतरी खाल्ल्याने आजाराच्या स्वरूपात गंभीर परिणाम भोगावे लागतील.
advertisement
3/7
अशा परिस्थितीत, बहुतेक लोकांना पॅकेज केलेले दूध फेकून द्यावे की ते वापरावे हे ठरवता येत नाही. अन्न तज्ञ म्हणतात की अनेक प्रकरणांमध्ये, त्याच्या अंतिम मुदतीनंतर एक किंवा दोन दिवस दूध पिणे योग्य आहे. मात्र हे ऋतूंवरही अवलंबून असते. जर तुम्ही हिवाळ्यात विचार केला तर त्याची मुदत संपल्यानंतरही ते फाटत नाही. जर ते फाटले नाही तर तुम्ही असे दूध पिऊ शकता.
advertisement
4/7
आहारतज्ज्ञांच्या मते, मुदत संपल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनीही अन्नपदार्थ खाल्ल्याने किंवा प्यायल्याने सहसा कोणतीही समस्या उद्भवत नाही. कंपन्या सावधगिरी बाळगण्यासाठी एक किंवा दोन दिवस आधी मुदत संपण्याची तारीख लावतात. काही प्रकरणांमध्ये अन्नपदार्थांवर मुदत संपण्याची तारीख खूपच गोंधळात टाकणारी असू शकते.
advertisement
5/7
मात्र, दुधाची बाब वेगळी आहे. जरी मुदत संपल्यानंतर दूध खराब झाले नाही, तरीही तुम्ही ते तुमच्या लहान मुलांना देणे टाळावे. हे दूध प्यायल्याने मुलांना हानिकारक बॅक्टेरियांचा संसर्ग होऊ शकतो, ज्यामुळे उलट्या, जुलाब आणि ताप येऊ शकतो. कुत्रे आणि मांजरींनादेखील एक्स्पायर झालेले दूध देण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
advertisement
6/7
साधारणपणे, अन्नपदार्थांवर तीन प्रकारच्या तारखा छापल्या जातात. बेस्‍ट इफ यूज्‍ड बाय डेट, द सेल बाय डेट आणि यूज बाय डेट. हे उत्पादन वापरणे तुमच्यासाठी केव्हा सुरक्षित आहे हे दर्शविते. जर तुम्ही बेस्‍ट बीफोर डेट किंवा एक्‍सपायरी डेटनंतर काही दिवसांनी अन्न-पेये घेतली तर कदाचित तुमच्यावर काही परिणाम होणार नाही. मात्र इतर उत्पादनांच्या तुलनेत दुधाबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Milk Expiry Date Importance : रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेले पॅकेटचे दूध एक्सपायरी डेटनंतर वापरणं योग्य आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल