TRENDING:

Monsoon Health Tips : पावसाळा सुरु होताच सर्दी खोकल्याने हैराण झालात? 5 घरगुती उपाय ठरतील प्रभावी

Last Updated:
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरात पावसाने सुरुवातीपासूनच तुफान बॅटिंग करायला सुरुवात केलीये. पावसाळा सुरु होताच वातावरणात झालेल्या बदलांमुळे अनेकजणांना ताप, सर्दी, खोकला यासारखे आजार होतात. तेव्हा काही घरगुती सोपे उपाय यावर प्रभावी ठरून तुमची तब्ब्येत सुधरू शकते.
advertisement
1/5
पावसाळा सुरु होताच सर्दी खोकल्याने हैराण झालात? 5 घरगुती उपाय ठरतील प्रभावी
पावसाळ्यात तुम्ही नियमितपणे हळदीचे दूध पिऊ शकता. हळदीच्या दुधात अँटीबायोटिक गुणधर्म असतात, दररोज रात्री हळदीचं दूध पिऊन झोपल्याने सर्दी, खोकला आणि वायरल फ्लू पासून आराम मिळू शकतो.
advertisement
2/5
पावसाळ्यात खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही मध आणि आलं याच चाटण करून खाऊ शकता. मध आणि आलं यामधील गुणधर्मांमुळे खोकल्यापासून आराम मिळतो आणि घशात होणारी खवखव दूर होते.
advertisement
3/5
पावसाळ्यात सर्दीचा त्रास होत असेल तर तुम्ही गरम पाण्याची वाफ घेऊ शकता. दिवसातून दोन ते तीन वेळा गरम पाण्याची वाफ घेतल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. तसेच सर्दीमध्ये तुम्ही भीमसेन कापूरचा सुद्धा वास घेऊ शकता.
advertisement
4/5
खोकला झाला असेल तर घशाच इन्फेक्शन दूर करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या काढा पिऊ शकता. तसेच तुळशीचा चहा सुद्धा सर्दी खोकल्यापासून समस्यांपासून आराम मिळवून देतो.
advertisement
5/5
पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकला आणि डोकेदुखीवर निलगिरीचे तेल उपयुक्त ठरू शकते. छातीत साचलेला कफ साफ करण्यासाठी तसेच त्यातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी तुम्ही निलगिरीचे तेल वापरू शकता. पाण्याला उकळी काढून तुम्ही त्यात निलगिरीच्या तेलाचे 4 ते 5 ड्रॉप टाकू शकता आणि डोक्यावर टॉवेल टाकून त्याची वाफ घेऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Monsoon Health Tips : पावसाळा सुरु होताच सर्दी खोकल्याने हैराण झालात? 5 घरगुती उपाय ठरतील प्रभावी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल