TRENDING:

Pregnancy Tips : उन्हाळ्यात गर्भवती महिलांनी असं राहा हायड्रेटेड, एक्सपर्टने सांगितले 6 हेल्दी ड्रिंक्स

Last Updated:
Healthy Summer Drinks In Pregnancy : गर्भधारणेचा काळ महिलांसाठी खरं तर खूप आनंदाचा आणि वेगवेगळे सुंदर अनुभव घेण्याचा काळ असतो. मात्र हीच गर्भधारणा जर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आली तर ती काहीशी त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच गर्भवती महिलेने उन्हाळ्यात हायड्रेटेड राहणे खूप गरजेचे असते. यासाठी महिला योग्य प्रमाणात पाणी पिण्यासोबतच विविध गोष्टींचे सेवन करतात. काही नैसर्गिक पेये गरोदरपणात उन्हाळ्यात जास्त प्रभावी मानली जातात. बाबा साहेब आंबेडकर मेडिकल कॉलेज, दिल्लीच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ज्योती यादव त्यांनी या हेल्दी ड्रिंक्सबद्दल माहिती दिली आहे.
advertisement
1/7
उन्हाळ्यात गर्भवती महिलांनी असं राहा हायड्रेटेड, नियमित घ्या हे हेल्दी ड्रिंक्स
नारळ पाणी : डॉ. ज्योती यादव सांगतात की, उन्हाळ्यात गर्भवती महिलांसाठी पाण्याव्यतिरिक्त नारळपाणी हा उत्तम पर्याय आहे. याच्या नियमित सेवनाने शरीरातील पाणी तर भरून निघतेच पण आवश्यक पोषक तत्वेही मिळतात. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्ससह अनेक पोषक घटक असतात, जे गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर असतात.
advertisement
2/7
फळांचा ज्यूस : उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी लोक आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/health-tips-eat-these-4-leaf-to-avoid-diseases-like-cholesterol-diabetes-anemia-mhpj-1176714.html">आहारात</a> अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश करतात. पण फळांचा रस देखील एक चांगला पर्याय आहे. उन्हाळ्यात उपलब्ध पाण्याने भरलेली फळे जसे की, टरबूज इत्यादींचे सेवन करणे देखील गर्भवती महिलांच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याच्या नियमित सेवनाने अनेक पोषक तत्वे देखील मिळतात.
advertisement
3/7
दूध : तज्ज्ञांच्या मते, गरोदरपणात दिवसातून एकदा तरी दूध प्यावे. दुधापासून शरीराला भरपूर कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12 आणि प्रथिने मिळतात. वडीलधारी मंडळी आपल्याला नेहमीच दूध पिण्याचा सल्ला देतात. दुधामुळे बाळाचा विकासही चांगला होतो. त्याचबरोबर <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health-tips-this-chinese-vegetable-is-more-powerful-than-spinach-makes-bones-and-heart-strong-mhpj-1176792.html">हाडांचा विकास</a> होण्यास मदत होते.
advertisement
4/7
लिंबू पाणी : उन्हाळ्यात पुरेशा प्रमाणात पाणी पिणे खूप गरजेचे आहे. मात्र बऱ्याचदा आपल्याला साधे पाणी प्यावेसे वाटत नाही. अशा परिस्थितीत लिंबू पाण्याचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. याचे सेवन गर्भवती महिलांसाठी चांगले मानले जाते.
advertisement
5/7
भाज्यांचे ज्यूस : उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी भाज्यांचे ज्यूस हा एक चांगला पर्याय आहे. काकडी आणि टोमॅटोसह अनेक उन्हाळी भाज्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात आढळते. पोषक तत्वांनी भरलेल्या या भाज्यांच्या ज्यूसचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. इच्छा असल्यास या भाज्यांची कोशिंबीरही खाऊ शकता.
advertisement
6/7
ताक-लस्सी : डॉक्टरांच्या मते, ताक हे उन्हाळ्यासाठी सर्वात फायदेशीर पेय आहे. रात्रीच्या जेवणात किंवा नाश्त्याच्या वेळी ताक पिऊ शकता. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि पोटाला थंडावा मिळतो. तुम्हाला हवं असेल तर कधी कधी गोड लस्सीही घेऊ शकता. ताक प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते.
advertisement
7/7
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Pregnancy Tips : उन्हाळ्यात गर्भवती महिलांनी असं राहा हायड्रेटेड, एक्सपर्टने सांगितले 6 हेल्दी ड्रिंक्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल