TRENDING:

Rat Control Tips : उंदीर येतात त्याठिकाणी हे फळ ठेवा, उंदीर घरातून पळून जातील; स्वस्त आणि प्रभावी उपाय

Last Updated:
घरात उंदीर वाढले तर आपल्याला ते घराबाहेर काढणं खूप अवघड जातं. म्हणूनच उंदीर हाकलण्यासाठी विविध उपाय केले जातात. त्यासाठी वेगवेगळी औषधंही वापरली जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत, जो वापरल्यास तुम्ही उंदराला न मारता घराबाहेर काढू शकता.
advertisement
1/10
उंदीर येतात त्याठिकाणी हे फळ ठेवा, उंदीर घरातून पळून जातील; स्वस्त-प्रभावी उपाय
उन्हाळा सुरू झाला आहे आणि याच वेळी घरात उंदीर शिरतात. उंदीर घरात शिरल्यानंतर ते आपलं जगणं कठीण बनवतात. घरातून उंदीर घालवण्यासाठी लोक काही औषध वापरतात. मात्र त्यामुळे आपल्याही आरोग्याला धोका असतो. अन्यथा ते चावतात आणि आपले कपडे, कागदपत्रे खराब करतात.
advertisement
2/10
उंदीर घरातील अन्नपदार्थही खराब करतात. उंदीर अन्नासह घरात सर्वत्र फिरून जंतू पसरवू शकतात. बरेच लोक उंदरं पकडून त्यांना घराबाहेर सोडण्यात यशस्वी होतात मात्र. हे सर्वानाच जमत नाही. शेवटी, ते उंदरांना विष देऊन मारतात. पण काही लोकांना उंदीर मारणे आवडत नाही.
advertisement
3/10
उंदीर मारण्यासाठी वड्या बाजारात मिळतात. या विषाने उंदीर मेल्यानंतर त्याला शोधून बाहेर फेकून द्यावे लागते. अन्यथा तुमचे संपूर्ण घर दुर्गंधीने भरून जाते. उंदीर मारल्यानंतर तो घरात कुठे पडला आहे, हे शोधणे आणखी एक आव्हानात्मक काम आहे.
advertisement
4/10
त्यामुळे लोक उंदरांना विष देऊन मारण्यास कचरतात. घरात खूप साठा किंवा खूप वस्तू असतील तर लोक उंदीर मारण्याचा धोका पत्करत नाही. इतर लोक उंदरांसाठी सापळे लावतात. त्यानंतर उंदीर घराबाहेर काढले जातात. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, उंदरांना खास पद्धतीने घराबाहेर ठेवता येते. पण ही पद्धत फक्त नर उंदरांनाच लागू आहे. मादी उंदरांसाठी नाही.
advertisement
5/10
होय, नुकत्याच आलेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, केळीच्या सहाय्याने घरातील, संभोग झालेल्या नर उंदरांपासून सुटका करणे शक्य आहे. केळी पाहिल्यावर नर उंदीर पळून जातात, असे संशोधनातून दिसून आले आहे.
advertisement
6/10
कॅनडाच्या मॅकगिल विद्यापीठाच्या 2022 च्या अभ्यासात असे आढळून आले की, नर उंदीर केळीला घाबरतात. गेल्या वर्षी 20 मे रोजी 'सायन्स ॲडव्हान्सेस' या जर्नलमध्ये शोधनिबंध प्रकाशित झाला होता. त्यामुळे नर उंदीर घालावण्यासाठी केळीचा वापर केला जाऊ शकतो. गरोदर उंदरांच्या आसपास नर उंदरांमध्ये स्ट्रेस हार्मोन्स का वाढतात याचे विश्लेषण करताना शास्त्रज्ञांनी हे शोधून काढले.
advertisement
7/10
या प्रकरणी संशोधन अहवालाचे ज्येष्ठ लेखक आणि मॅकगिल विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक जेफ्री मोगिल यांनी सांगितले की, हे आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे. कारण हे आमच्या संशोधनाचे उद्दिष्ट नव्हते. पण ते म्हणतात की, हा शोध आम्हाला अपघाताने लागला.
advertisement
8/10
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, गरोदर उंदीर त्यांच्या लघवीत एक विशेष रसायन स्रवतात जेणेकरुन त्यांच्या पिलांना नर उंदरांपासून वाचवावे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की नर उंदीर पिल्लांच्या जवळ जात नाही. कारण गर्भवती आणि स्तनपान करणा-या उंदरांच्या मूत्रात एन-पेंटाइल एसीटेट नावाचे रसायन असते.
advertisement
9/10
हे कंपाऊंड उंदरांमध्ये तणाव निर्माण करते. अभ्यासात असे दिसून आले आहे की केळीमध्ये एन-पेंटाइल संयुगे आढळतात. त्यामुळे नर उंदरांना केळीची भीती वाटते. केळी दिसल्यावर उंदीर पळून जातात. आता तुम्ही तुमच्या घरातील नर उंदीर दूर करण्यासाठी केळी वापरू शकता.
advertisement
10/10
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालात असे म्हटले आहे की, घरी केळी ठेवून तुम्ही उंदरांपासून मुक्ती मिळवू शकता. घरात आधीच उंदीर असतील तर त्या ठिकाणी तुम्ही पिकलेली केळी टाकू शकता. उंदरांना न मारता त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी केळी हा उत्तम उपाय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Rat Control Tips : उंदीर येतात त्याठिकाणी हे फळ ठेवा, उंदीर घरातून पळून जातील; स्वस्त आणि प्रभावी उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल