TRENDING:

तुमच्या खात्यात PM Kisan चा हप्ता आलाच नाही का? पैसे मिळवण्यासाठी काय कराल?

Last Updated:
PM Kisan Yojana : केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे.
advertisement
1/6
तुमच्या खात्यात PM Kisan चा हप्ता आलाच नाही का? पैसे मिळवण्यासाठी काय कराल?
केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे प्रत्येक चार महिन्यांनी 2 हजार रुपयांचे तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.
advertisement
2/6
काल 19 नोव्हेंबर रोजी या योजनेचा 21 वा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र, अनेक शेतकरी ई-केवायसी न केल्यामुळे या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत. शासनाने अनेकदा सूचना दिल्या होत्या, तरी अनेकांनी केवायसी अद्ययावत केली नसल्याने त्यांना लाभ मिळू शकला नाही.
advertisement
3/6
पीएम किसान योजनेची माहिती - केंद्र सरकारने लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून ही योजना सुरू केली आहे.2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये (3 हप्ते × 2,000 रुपये) रक्कम थेट बँक खात्यात जमा होते.
advertisement
4/6
हप्ता न मिळण्यामागील प्रमुख कारणे - पीएम किसानच्या अनेक लाभार्थ्यांचे पैसे अडत असल्याचे दिसून आले. यामागील मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत.जमिनीच्या कागदपत्रांतील त्रुटी, 7/12 सारख्या नोंदी अपूर्ण असणे, नावातील चुका, जमिनीचा प्रकार किंवा क्षेत्र चुकीचे नोंदवणे, आधार लिंकिंग नसणे, बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले नसणे, आधार पडताळणी अपूर्ण राहणे, पात्रता निकष पूर्ण नसणे, 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन, सरकारी किंवा अर्धसरकारी नोकरी, चुकीची माहिती भरल्यामुळे पात्रतेतून वगळणे, तांत्रिक अडचणी, सर्व्हर त्रुटी फॉर्म अपूर्ण राहणे, ओटीपी न मिळणे इ. कारणे आहेत.
advertisement
5/6
ई-केवायसी कशी आणि कुठे करावी? - दरवर्षी ई-केवायसी करणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांनी खालीलपैकी मार्गाने ती पूर्ण करावी. अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in ला भेट द्या. नंतर 'ई-केवायसी' पर्याय निवडा. आधार क्रमांक टाका.मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे पडताळणी करा
advertisement
6/6
तर हप्ता पुन्हा मिळणार - 21 वा हप्ता वितरित झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, मात्र ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांना लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे पुढील हप्ता नियमीत मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
तुमच्या खात्यात PM Kisan चा हप्ता आलाच नाही का? पैसे मिळवण्यासाठी काय कराल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल