TRENDING:

Ishan Kishan : इशानने शतक ठोकलं, पण महत्त्वाच्या परिक्षेत फेल झाला, टीम इंडियाचा प्रयोग फसला

Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 46 रननी दणदणीत विजय झाला आहे. भारताने दिलेल्या 272 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा 19.4 ओव्हरमध्ये 225 रनवर ऑलआऊट झाला.
advertisement
1/7
इशानने शतक ठोकलं, पण महत्त्वाच्या परिक्षेत फेल झाला, टीम इंडियाचा प्रयोग फसला
इशान किशन हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. इशानने फक्त 43 बॉलमध्ये 10 सिक्स आणि 6 फोरच्या मदतीने 103 रन केल्या. इशानने त्याच्या या वादळी खेळीमध्ये 239.53 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली.
advertisement
2/7
इशान किशनशिवाय सूर्यकुमार यादवने 30 बॉलमध्ये 63 आणि हार्दिक पांड्याने 17 बॉलमध्ये 42 रनची खेळी केली. शतक झळकावल्याबद्दल इशान किशनला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
advertisement
3/7
बॉलिंगमध्ये भारताकडून अर्शदीप सिंगने 5 विकेट घेतल्या, तर अक्षर पटेलला 3 विकेट मिळाल्या. याशिवाय वरुण चक्रवर्ती आणि रिंकू सिंग यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
4/7
इशान किशन भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला असला तरी या सामन्यात त्याच्याकडून दोन मोठ्या चुका झाल्या. या सामन्यात संजू सॅमसनऐवजी इशान किशनने विकेट कीपिंग केली, पण यात त्याने दोन आऊट सोडले.
advertisement
5/7
नवव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला अक्षर पटेलच्या बॉलिंगवर फिन ऍलन क्रीजसोडून मोठा शॉट मारण्यासाठी बाहेर आला, पण त्याच्या बॅटला बॉल न लागता इशान किशनच्या दिशेने गेला. इशानने स्टम्पिंगची संधी सोडली, आणि न्यूझीलंडला बाईजच्या 4 रन मिळाल्या.
advertisement
6/7
यानंतर 17 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला अक्षर पटेलच्याच बॉलिंगवर इशान किशनने इश सोढीचा कॅच आणि स्टम्पिंगही सोडला. इशान किशनने बॅटिंगमध्ये धमाका केला असला तरी त्याची विकेट कीपिंग मात्र निराशाजनक झाली.
advertisement
7/7
संजूचा खराब फॉर्म बघता टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याला टीमबाहेर ठेवलं जाऊ शकतं, या परिस्थितीमध्ये इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, त्यामुळे इशान किशनकडून या सामन्यात विकेट कीपिंग करून घेण्यात आली, पण टीम इंडियाचा हा प्रयोग फसला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Ishan Kishan : इशानने शतक ठोकलं, पण महत्त्वाच्या परिक्षेत फेल झाला, टीम इंडियाचा प्रयोग फसला
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल