Matar Recipes :मटारपासून हेही बनू शकतं? 5 भन्नाट रेसिपी ज्या फारच कमी लोकांना माहीत आहेत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मटार बटाटा, पनीर मटार, पावभाजी, पुलाव हे तर घराघरात बनवले जातात. पण या शिवाय मटारचं आणखी काही वेगळं बनवू शकतो का? असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. तुम्हाला पण असाच प्रश्न पडला असेल आणि मटारपासून (Matar Recipes) वेगळं काय बनवायचं अशा विचारात तुम्ही पडला असाल तर या मटारच्या सोप्या रेसिपी तुमच्यासाठीच आहेत.
advertisement
1/7

हिवाळ्यात मटार भरपूर आणि ताजे मिळतात. हाच मटरचा सिजन असल्यामुळे ते स्वस्त मिळतात ज्यामुळे गृहिणी मटार मोठ्या प्रमाणात घरी आणतात. एरवी 100 ते 120 रुपये किलो ने विकला जाणारा मटार हिवाळ्याच्या सिजनला अगदी 20 रुपये किलोने देखील विकला जातो, ज्यामुळे बहुतांश घरात मटारच दिसतात. पण मटारच्या किती भाजी बनवायच्या?
advertisement
2/7
मटार बटाटा, पनीर मटार, पावभाजी, पुलाव हे तर घराघरात बनवले जातात. पण या शिवाय मटारचं आणखी काही वेगळं बनवू शकतो का? असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. तुम्हाला पण असाच प्रश्न पडला असेल आणि मटारपासून (Matar Recipes) वेगळं काय बनवायचं अशा विचारात तुम्ही पडला असाल तर या मटारच्या सोप्या रेसिपी तुमच्यासाठीच आहेत.
advertisement
3/7
1) मटार कबाब (Matar Hara Bhara Kabab)उकडलेले मटार, उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, पुदिना आणि गरम मसाला एकत्र करून छोटे कबाब बनवा. थोड्या तेलात शॅलो फ्राय करा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ – पार्टीसाठी परफेक्ट स्टार्टर.
advertisement
4/7
2) मटार पराठा (Matar Paratha)किसलेले मटार, आलं-हिरवी मिरची आणि थोडं बेसन पीठात मिसळून पराठे लाटून भाजा. लोणी किंवा दह्यासोबत हे पराठे ब्रेकफास्टसाठी भन्नाट लागतात.
advertisement
5/7
3) मटार ह्युमसउकडलेले मटार, तीळ (ताहिनी), लसूण, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र वाटून घ्या. हा हिरव्या रंगाचा ह्युमस ब्रेड, पिटा किंवा क्रॅकर्ससोबत वेगळ्याच चवीचा अनुभव देतो.
advertisement
6/7
4) मटार-नारळ भाजीमटार नारळाच्या दुधात, मोहरी-जिरे फोडणीसोबत शिजवून घ्या. फारसे मसाले न वापरता तयार होणारी ही भाजी हलकी, सुगंधी आणि पोटासाठीही चांगली असते.
advertisement
7/7
5) मटार चाट (Matar Chat)उकडलेले मटार, कांदा, टोमॅटो, चाट मसाला, लिंबाचा रस आणि थोडी शेव मिसळून झटपट चाट तयार करा. संध्याकाळच्या भुकेसाठी हेल्दी आणि चविष्ट पर्याय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Matar Recipes :मटारपासून हेही बनू शकतं? 5 भन्नाट रेसिपी ज्या फारच कमी लोकांना माहीत आहेत