विदर्भातील फेमस रोडगे कधी खाल्लेत का? घरातच बनवा सोपी रेसिपी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महाराष्ट्रात प्रत्येक भागानुसार वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. विदर्भातील ग्रामीण भागात रोडगे म्हणजेच पानगे प्रसिद्ध आहेत.
advertisement
1/7

महाराष्ट्रात प्रत्येक भागानुसार वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. विदर्भात प्रसिद्ध पारंपारिक पदार्थ रोडगे आहे. विदर्भातील खवय्यांच्या खास जिव्हाळ्याचा आणि आवडीचा हा पदार्थ आहे. हा पदार्थ मूळ ग्रामीण भागातला आहे. रोडगे म्हणजेच पानगे बनविण्यासाठी शेणाच्या गोवऱ्या अतिशय महत्त्वाच्या आहेत.
advertisement
2/7
ग्रामीण भागात गोवऱ्या उपलब्ध होतात. मात्र, शहरी भागातील नागरिकांना गोवऱ्या सहजासहजी उपलब्ध होत नाही. मग शहरी भागातील नागरिकांनी आपला पारंपारिक पदार्थ पानगे किंवा रोडगे कसा बनवावा याबद्दल <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्ध्यातील</a> रोडगे बनवणाऱ्या गृहिणी मीना शिंदे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
पूर्वी ग्रामीण आणि शहरी भागातही मोठ्या प्रमाणात रोडगे हा पदार्थ बनविला जायचा. जिथे गोवऱ्या उपलब्ध असतात तिथेच रोडगे बनवले जायचे.
advertisement
4/7
वाढत्या शहरीकारणामुळे गोवऱ्या उपलब्ध होत नाही. त्यामुळे रोडगे बनवणे ही शक्य होत नाही. मात्र, शहरातील नागरिकांना रोडग्यांची आठवण येत असते. त्यामुळे तुम्ही रोडगे हे आप्पेपात्रात देखील बनवू शकतात, असं मीना शिंदे सांगतात.
advertisement
5/7
आप्पेपात्रात नेमके रोडके बनवायचे कसे? एक ग्लास गव्हाच्या पिठात पाऊण ग्लास रवा मिक्स करावा. त्यात चवीपुरते मीठ चमचाभर जिरे,ओवा, तसेच खाण्याचा सोडा आणि मोठा चमचाभर तेल घालावे.
advertisement
6/7
त्यानंतर हे सर्व एकत्र करून पाण्याने कडकसर भिजवून घ्यावे. त्यानंतर एका गोळ्याची पारी बनवावी त्यात तेल लावावे आणि पोकळ गोळा तयार करून घ्यावा. त्यानंतर आप्पेपात्रात तेल टाकून गरम करून घ्यावे.
advertisement
7/7
आता हे गोळे आप्पेपात्रात ठेवून 5 मिनिटं मंद आचेवर राहू द्यावे. तांबूस रंग आल्यावर त्याला पलटून घ्यावे. यादरम्यान रोडगे जळणार नाही याची काळजी घ्यावी आणि कुरकुरीत होईपर्यंत त्याला परतत राहावे. या प्रक्रियेला जवळजवळ 10-15 मिनिट वेळ लागतो. त्यानंतर वांग्याच्या भाजी सोबत कुरकुरीत रोडगे सर्व्ह करावेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
विदर्भातील फेमस रोडगे कधी खाल्लेत का? घरातच बनवा सोपी रेसिपी