Cooking Tips : डाळीत हळद आणि मीठ कधी टाकायचं? 99% लोक करतात ही चूक
- Published by:Priya Lad
Last Updated:
How to cook daal recipe : डाळीची चव आणि पोषण दोन्ही टिकून राहावं यासाठी डाळ शिजवताना हळद आणि मीठ कधी घालावं हे फार कमी लोकांना माहिती आहे.
advertisement
1/7

डाळ हा भारतीय आहारातील एक प्रमुख पदार्थ. डाळीत प्रोटिन, आयर्न, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. पण ती योग्य प्रकारे शिजवली तर हे पोषण घटक आपल्याला शरीराला मिळतील आणि डाळीची तवही कायम राहिल.
advertisement
2/7
प्रत्येकाची डाळ बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पण डाळीत हळद आणि मीठ हे सामान्य इंग्रेडिएंट्स असतातच. पण ते डाळीत कधी टाकायचे याचीसुद्धा विशिष्ट वेळ आहे. नाहीतर डाळीची चव बिघडेल आणि त्यातील पोषण मूल्यही कमी होतील. (AI Generated image)
advertisement
3/7
हळद ही एक नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे आणि त्यात कर्क्यूमिन नावाचा घटक असतो, जो शरीरातील जळजळ कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. (AI Generated image)
advertisement
4/7
डाळीत हळद घालायची तर ती डाळ उकळताना घालावी. ज्यामुळे हळदीला डाळीसोबत शिजवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, त्याचे औषधी गुणधर्म डाळीमध्ये पूर्णपणे शोषले जातील. (AI Generated image)
advertisement
5/7
मिठाचं म्हणायचं तर जर तुम्ही डाळ शिजवण्यापूर्वी किंवा सुरुवातीच्या टप्प्यात मीठ घातलं तर डाळीचे दाणे कडक होतील आणि शिजण्यास जास्त वेळ लागेल. मिठामध्ये असलेलं सोडियम आयर्न डाळीचा बाह्य थर कडक करतात, ज्यामुळे डाळ पूर्णपणे मऊ होऊ शकत नाही. (AI Generated image)
advertisement
6/7
म्हणून नेहमी डाळ पूर्णपणे शिजल्यावर, ती सहज मॅश करता येईल अशावेळीच त्यात मीठ घाला. यामुळे डाळ खूप मऊ होते आणि त्यांची चवही अप्रतिम असते. (AI Generated image)
advertisement
7/7
हळद आणि मीठ घालण्याच्या या छोट्या पण महत्त्वाच्या नियमांचे पालन करून, तुम्ही फक्त डाळीची चवच नाही तर त्याचं पौष्टिक मूल्य पूर्णपणे जपू शकता. या छोट्या सवयीमुळे तुमच्या अन्नाची पौष्टिक पातळी लक्षणीयरित्या वाढेल आणि कुटुंबाचे आरोग्यही चांगलं राहिल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cooking Tips : डाळीत हळद आणि मीठ कधी टाकायचं? 99% लोक करतात ही चूक